विज्ञान संवाद

विज्ञान संवाद

  • वैज्ञानिक स्वभाववृत्तीचे संवर्धन आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘विज्ञान प्रसार’ SCOPE सह (विज्ञान संप्रेषण, लोकप्रियता आणि विस्तार) विविध माध्यमांच्या सहाय्याने सक्रियपणे कार्यरत आहे.

अ) इलेक्ट्रॉनिक माध्यम : विज्ञानावर आधारित दोन उपक्रम विज्ञान प्रसार (VP) ने १५ जानेवारी २०२० रोजी सुरू केले, पहिले ‘डीडी विज्ञान (DD Science)’ व दुसरे ‘भारत विज्ञान (India Science)’

ब) भारतातील विविध भाषांच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीचा ‘विज्ञान भाषा’ उपक्रम

क) रेडिओ : ऑल इंडिया रेडिओच्या ११७ स्टेशन्सवरून १९ भाषांत विज्ञानविषयक कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते.

ड) नेटवर्क क्लब : विज्ञान प्रसार नेटवर्क ऑफ सायन्स क्लब (VIPNET) हा शालान्त कौशल्य सुधारणा प्रशिक्षण, जागरूकता कॅम्प, विज्ञान कार्यशाळा इत्यादींचे संपूर्ण देशभरात आयोजन करतो.

इ) संशोधन : ‘अवसर (AWSAR)’ हा उपक्रम पीएचडी तसेच पोस्ट डॉक्टरेट स्कॉलर्सना त्यांच्या फेलोशिप काळात विज्ञानविषयक लेख लिहिण्यास व नंतर ते एका पुस्तकात प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देते.

Contact Us

    Enquire Now