वाघांची संख्या दुप्पट करण्याच्या लक्ष्याची गिनीजबुककडून दखल

वाघांची संख्या दुप्पट करण्याच्या लक्ष्याची गिनीजबुककडून दखल

  • भारताने निर्धारित वेळेच्या आत वाद्यांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य पूर्ण केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे.
  • व्याघ्र संवर्धनासाठी केलेले प्रयत्न व गणनेसाठी अत्याधुनिक पद्धती याबद्दल राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
  • भारतातील संरक्षित क्षेत्रात १४१ विविध ठिकाणावरील सुमारे २६ हजार ८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. या कॅमेरा ट्रॅपमध्ये गतिमान सेन्सर्स आणि छायाचित्र घेणारे उपकरण आहे. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून सुमारे १ लाख २१ हजार ३३७ चौरस किलोमीटर्समधील परिणामकारक क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या कॅमेरा ट्रॅपमधून ३ कोटी ४८ लाख ५८ हजार ६२३ वन्यजीवांची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यापैकी ७६ हजार ६५१ वाघांची छायाचित्रे होती. स्ट्रीप पॅटर्न सॉफ्टवेअरच्या माध्यमातून २४६१ वाघांची ओळख पटविण्यात आली. 
  • ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून पार पाडली.

व्याघ्र जनगणना २०१८ :

  • जागतिक व्याघ्र दिनी (२९ जुलै) रोजी व्याघ्र जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात येते. दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. पहिली व्याघ्र गणना २००६. २०१८ ची चौथी व्याघ्र गणना होती. या गणनेनुसार देशात एकूण २९६७ वाघ असून २०१४ च्या तुलनेत ७४१ वाघ जास्त आहेत. छत्तीसगढ आणि मिझोराम वगळता अन्य राज्यांत वाघाच्या संख्येत वाढ झाली असून ओदिशात वाघांची संख्या तेवढीच आहे. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक वाघ असून तामिळनाडूतील सत्यमंगलम व्याघ्रप्रकल्पात सर्वाधिक वाढ झालेली आहे.
व्याघ्रगणना वाघांची संख्या
२०१८ २९६७
२०१४ २२२६
२०१० १७०६
२००६ १४११

 

महाराष्ट्रातील वाघांची संख्या
२०१८ ३१२
२०१४ १९०
२०१० १६८
२००६ १०३

 

सर्वाधिक वाघांची संख्या असलेली राज्य
मध्यप्रदेश ५२६
कर्नाटक ५२४
उत्तराखंड ४४२
महाराष्ट्र ३१२
तमिळनाडू २६४

Contact Us

    Enquire Now