
वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक : आयएमएफ
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारतासाठी २०२१चा जीडीपी वाढीचा अंदाज १२.५ टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
- हा अंदाज वर्तविताना आयएमएफने कोरोना लशींची उपलब्धता तसेच नवीन कोरोना उपप्रकारांचा धोका हे दोन प्रमुख घटक मानले आहेत.
प्रमुख मुद्दे:
अ) भारतीय अर्थव्यवस्था
- भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. (एप्रिलमध्ये वर्तविलेल्या ६.९ टक्क्यांपेक्षा अधिक)
- भारताची अर्थव्यवस्था २०२० मध्ये ७.३ टक्क्यांपर्यंत आकुंचन पावली.
ब) जागतिक अर्थव्यवस्था
- २०२१ साठी जागतिक वाढीचा अंदाज ६ टक्के कायम असून २०२२ साठी ४.९ टक्के होण्याचा अंदाज.
- २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३.३ टक्क्यांनी संकुचित झाली.
क) जागतिक व्यापार
- जागतिक व्यापारवाढीच्या अंदाजामध्ये २०२१ साठी १३० बीपीएस ते ९.७ टक्के आणि २०१२ साठी ५० बीपीएस ते ७ टक्के वाढ.
- सल्ला:
अ) कडक बाह्या आर्थिक परिस्थितीसाठी कर्जाची परिपक्वता वाढवून मर्यादित परकीय कर्जाची बांधणी करून ठेवणे.
ब) चलनवाढीला सामोरे जाताना मध्यवर्ती बँकांनी कडक धोरणे टाळणे.
क) टेक – ॲपला चालना देण्यासाठी लस उत्पादन आणि वितरण, पायाभूत सुविधा, कर्मचारी आणि सार्वजनिक आरोग्य मोहिमांसह आरोग्यविषयक खर्चास राजकोषीय धोरणात प्राधान्य देणे चालू ठेवणे.
- २०२२ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचे अंदाज
१) जागतिक बँक : ८.३%
२) आशियाई विकास बँक : १०%
३) रिझर्व्ह बँक : २०.५%
४) मूडीज् : ९.३%
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)
-
- स्थापना : २७ डिसेंबर १९४५
- मुख्यालय : वॉशिंग्टन डी.सी.
- सदस्य देश : १९०
- प्रकाशने :
-
- ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (अर्धवार्षिक : एप्रिल व ऑक्टोबर)
- वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक (वर्षातून दोनदा : एप्रिल व ऑक्टोबर)