वर्ल्ड्स् बेस्ट स्टार्टअप इकोसिस्टिम रँकिंगमध्ये भारत २३ वा
- स्टार्टअपब्लिंक या कंपनीच्या ‘कंट्रीज ग्लोबल रँकिंग ऑफ स्टार्टअप इकोसिस्टिम २०२०’ रँकिंगमध्ये भारताचा २३वा क्रमांक आहे. २०१९ मध्ये भारत १९व्या स्थानावर होता. या रँकिंगमध्ये अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे. तर युनायटेड किंग्डम दुसर्या स्थानावर आहे.
- स्टार्टअपब्लिंक, स्टार्टअपची संख्या, त्यांची गुणवत्ता आणि व्यावसायिक वातावरण या आधारावर मानांकन करते. १४,००० कोवर्किंग स्पेसेसमधील ६०,००० स्टार्टअपची माहिती आणि जगातील विविध शहरातील १०० इन्फ्लुएन्झर्सच्या माहितीनुसार मानांकन करते.
- भारतातील ४ शहरे वरच्या १०० शहरांच्या यादीत आहेत. बंगळुरू १४व्या, नवी दिल्ली १५व्या स्थानी, मुंबई २२व्या स्थानी तर हैदराबाद ९६व्या स्थानी आहे.