वन्यप्राण्यांसाठी समृद्धीवर २९५ उन्नत, भुयारी मार्ग
- मुंबई-नागपूर हा अतिवेगवान समृद्धी महामार्ग वन्यप्राण्यांना नैसर्गिकपणे व निर्धोकपणे ओलांडता यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या या महामार्गावर २९५ ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग व इतर व्यवस्था करण्यात येत आहे.
- रस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून फार तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी कुंपण घातले जाते. परंतु यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो.
- सुमारे ७०० कि.मी.चा हा महामार्ग असून केवळ सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे. १४ जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. त्यापैकी ११८ कि.मी.चा पट्टा हा वनक्षेत्रातून जातो.
- या परिसरात भारतीय वन्यजीव महामंडळानुसार नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, जंगली डुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी तर जंगली मांजर, बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, अस्वल यांसारखे मांसाहारी प्राणी आढळतात.
- प्राण्यांना महामार्ग सहज ओलांडता यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर पाच मोठे पूल, १९ लहान पूल, १९ भुयारी मार्ग, सात उन्नत मार्ग यासह लहानमोठ्या अशा २९५ संरचना करण्यात येणार आहेत.