वन्यजीव संरक्षण पूल

वन्यजीव संरक्षण पूल

  • दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा वन्यजीव संरक्षणाचे पूल असलेला देशातील प्रथम महामार्ग असणार आहे. द्रुतगतीमार्ग, महामार्ग बांधताना वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. रस्त्याचे बांधकाम होताना व झाल्यानंतर वन्यजीवांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून नेदरलँडमध्ये वापरले जाणारे प्राण्यांसाठी खास पूल दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर उभारले जाणार आहेत.
  • राजस्थानमधील रणथंबोर येथील वाघ आणि इतर वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी पाच प्राणी-पूल उभारले जाणार आहेत. हे पूल रणथंबोरला मुकुंद्रा(दाराह)शी जोडतील. तसेच येथील रस्ता ओलांडण्यासाठी दर अर्धा किलोमीटरला प्राण्यांसाठी सोय केलेली असेल.
  • या प्रकारचे पूल बांधल्याने गाड्यांना धडकून प्राण्यांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी होईल. 

मुंबई-दिल्ली ग्रीनफिल्ड प्रकल्पाबाबत:

– दोन्ही शहरांमधील अंतर 24 तासांवरून 13 तासांवर.

– 1320 किलोमीटर लांबी.

– 890 कोटी रुपये खर्च.

– पूर्ण क्षमतेने वापर: 2024 साली.

– पाच प्राणी-पूल (एकूण लांबी 2.5 किलोमीटर)

– संरक्षित क्षेत्र: रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, राजस्थान.

Contact Us

    Enquire Now