वनसमृद्ध महाराष्ट्र
- महाराष्ट्र वनविभागाने २०२१च्या पावसाळ्यात सुमारे २ कोटी ५७ लाख ३२ हजार रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.
विभाग | रोपे लावण्याचे काम सुरू |
१) वन विभाग | ९०६५००० |
२) बांबू मंडळातर्फे | ५९००००० |
३) महाराष्ट्र वनविकास महामंडळ | ४७८५००० |
४) वन्यजीव शाखा | २९८००० |
- १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, वन विभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत.
- राष्ट्रीय वन धोरण १९८८ नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राचे ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित/वृक्षाच्छादित ठेवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्रवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.
शासकीय रोपवाटिकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ३३ जिल्ह्यांमध्ये शासनाच्या मध्यवर्ती रोपवाटिका कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक महसूल विभाग स्तरावर एक याप्रमाणे सहा ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपनिर्मितीसाठी रोपवाटिका स्थापित आहेत. राज्यात सर्वदूर सामान्य जनतेला वनीकरणासाठी रोपे उपलब्ध व्हावीत या हेतूने तालुकास्तरावर एकूण २८० आधुनिक रोपवाटिका कार्यरत असून त्यातून रोपांची निर्मिती केली जात आहे.