लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांद्वारे इंटरनेट सुविधा

लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांद्वारे इंटरनेट सुविधा

  • वनवेब या लो अर्थ ऑर्बिट उपग्रह कम्युनिकेशन ऑपरेटरद्वारा ३६ उपग्रह रशियामधून प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
  • वनवेब या खासगी कंपनीद्वारा आतापर्यंत २१८ लिओ उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत.

वनवेबचा लिओ इंटरनेट प्रोग्रॅम

  • उद्देश : युनायटेड किंग्डम, अलास्का, उत्तर युरोप, ग्रीनलँड, आर्क्टिक महासागर आणि कॅनडामधील लिओ (LEO) उपग्रहांद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा पर्याय प्रदान करणे.
  • या उपक्रमांतर्गत ५० उत्तरेकडील सर्व भागात इंटरनेट सुविधा प्रदान करण्यात येईल, यासाठी वनवेबने या सुविधेचे नाव  ‘५ to ५०’ असे ठेवले आहे.
  • २०२२ मध्ये उपलब्ध ६४८ उपग्रहांद्वारे ही वैश्विक सेवा सुरू होऊ शकते.

लिओ उपग्रह आधारित इंटनेटचे फायदे :

  • हे उपग्रह पृथ्वीच्या ५०० ते २००० किमी अंतरावर स्थित असतात.
  • भूस्थित उपग्रहांपेक्षा हे उपग्रह वेगवान गती तसेच उत्कृष्ट सिग्नल पुरवतात.
  • फायबर ऑप्टिक केबल्सपेक्षा अंतराळातून अधिक वेगाने सिग्नल प्रवास करतात त्यामुळे विद्यमान ग्राऊंड-बेस्ड नेटवर्कशी प्रतिस्पर्धा करण्याची क्षमता त्यात असते.

 

आव्हाने :

 

  1. लिओ उपग्रहास पृथ्वीची कक्षा पूर्ण करण्यास २७००० किमी प्रती तास या वेगाने ९०-१२० मिनिटे लागतात, त्यामुळे अगदी थोड्या काळासाठी वैयक्तिक उपग्रह लँड ट्रान्समीटरशी संपर्क साधू शकतात.
  2. यासाठी मोठ्या प्रमाणात लिओ उपग्रह फ्‍लीट्‌स व परिणामी अधिक भांडवलाची आवश्यकता
  3. खगोलशास्रज्ञांना रात्रीच्या वेळी निरीक्षणामध्ये या उपग्रहांच्या उपस्थितीमुळे बाधा निर्माण होऊ शकते.
  4. आता अंतराळातील शक्तीचे संतुलन देशांकडून कंपन्यांकडे स्थानांतरित होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील नियंत्रणाचा मोठा प्रश्न आहे.

वापर :

  1. फायबर आणि स्पेक्ट्रम सेवेद्वारे पोहोचता येत नाही, अशा भागात लिओ उपग्रह ब्रॉडबँड उपग्रह सोयीस्कर ठरतात.
  2. म्हणूनच लक्ष्य हे ग्रामीण भागातील लोकसंख्या आणि शहरी भागांपासून दूर कार्यरत लष्करी एकके असतील.

 

इतर प्रकल्प :

 

  1. वनवेबचा मुख्य प्रतिस्पर्धा म्हणून एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या नेतृत्वाखालील ‘स्टारलिंक’
  2. स्टारलिंककडे सध्या इन-ऑर्बिट १३८५ उपग्रह असून त्यांनी पूर्वीच बीटा चाचणी घेण्यास अमेरिकेत सुरुवातही केली आहे.
  3. तसेच भारतासारख्या देशात प्री-ऑर्डर घेण्यास सुरुवात

Contact Us

    Enquire Now