लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच

लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच

 • लोणार सरोवराच्या विकासासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयातूनच विकासाची सूत्रे मार्गी लावली जातील अशी घोषणा लोणार सरोवराची पाहणी करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
 • मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
 • सरोवराच्या विकास आराखड्याच्या बैठकीत ते म्हणाले की लोणार सरोवरासाठी विकास आराखडा तयार करणे व त्यासाठी प्राधिकरण स्थापन करणे.
 • लोणार सरोवर जैवविविधतेचे भांडार आहे.
 • लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करणे.
 • लोणार सरोवराच्या विकासासाठी २०५ कोटी १२ लाख रुपयांचा आराखडा.

लोणार सरोवर

 • राज्य – महाराष्ट्र, बुलढाणा जिल्ह्यात
 • निर्मिती – उल्कापातामुळे
 • क्षेत्र – ११३ हेक्टर
 • खाऱ्या पाण्याचे तिसरे सरोवर
 • लोणार हे बेसाॅल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.
 • महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर एक आहे.
 • लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील ४१वी साईट म्हणून रामसार कन्वेंशन ऑन वेटलँड सेव्हेटरिएट स्वित्झर्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केले.

Contact Us

  Enquire Now