लॉस एंजेलिसमध्ये विवेकानंद योग विद्यापीठ
- भारताबाहेरील प्रथम विवेकानंद योग विद्यापीठाची अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने या विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले.
- भारतीय प्राचीन शास्त्र योगाची वैज्ञानिक तत्त्वे आणि आधुनिक संशोधन दृष्टिकोन या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
- योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र हे विवेकानंद योग विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत.
- नोव्हेंबर २०१९ मध्ये कॅलिफोर्नियाच्या ब्युरो ऑफ प्रायव्हेट पोस्ट सेकंडरी एज्युकेशनने योग आधारित उच्च शिक्षण कार्यक्रमांना मान्यता दिली आहे.