‘लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट’; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालीवर राहिल बारीक नजर
- मुंबईच्या आसपास असणाऱ्या बिबट्यांचे विश्व उलघडणार आहे.
- बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा नेमका प्रवास कसा होतो, काय करतो, कुठे जातो या बद्दलची सगळी माहिती रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.
- मुंबईमध्ये अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.
- उद्यानातील रेडिओ कॉलर लावलेल्या बिबट्या मादीचे नाव ‘सावित्री’ आहे.
- बिबट्यांचा अधिवास, त्याच्या भक्ष्यासाठीच्या हालचाली, त्यासाठीचा प्रवास इत्यादी बाबी रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेणे सोपे होणार आहे.
- याला ‘लेपर्ड कॉलर’ प्रकल्पही म्हटले जाते.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- बिबट्या व मानवातील परस्परक्रियांचा अभ्यास
- बिबटे घोडबंदर कसे ओलांडतात.
- मानव व बिबट्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.
- महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यान
राष्ट्रीय उद्यान | जिल्हा | क्षेत्रफळ (चौ. कि.मी.) | घोषणा (निर्मिती) |
१) ताडोबा अंधारी | चंद्रपूर | ११६.५५ | १९५५ |
२) पेंच (पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान) | नागपूर | २५७.८६ | १९७५ |
३) नवेगाव बांध | गोंदिया | १३३.८८ | १९७५ |
४) संजय गांधी | मुंबई उपनगर (बोरिवली) | ८६.९६ | १९८३ |
५) गूगामल | मेळघाट (अमरावती) | ३६१.२८ | १९८७ |
६) चांदोली | शिराळा (सांगली) | ३१७.६७ | २००४ |
- सर्वात लहान उद्यान (महाराष्ट्रातील) – संजय गांधी
- सर्वात मोठे उद्यान (महाराष्ट्रातील) – गूगामल