लि हिसियन लूंग सिंगापूरचे तिसरे पंतप्रधान

लि हिसियन लूंग सिंगापूरचे तिसरे पंतप्रधान

 • कोविड १९ साथीच्या रोगादरम्यान झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ९३ पैकी ८३ जागा जिंकलेल्या सत्ताधारी ‘पिपल्स अ‍ॅक्शन पार्टीने’ स्पष्ट जनादेश मिळविला आहे.
 • १९६५ मध्ये स्वातंत्र्यानंतर लगेच सत्तेत आलेल्या सत्ताधारी पक्षाने २०२० च्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतांपैकी ६१.२४ टक्के मते मिळविली.
 • २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला ६९.९% मते होती.
 • २०१५ च्या तुलनेत २०२० च्या निवडणुकीत एकूण मतांचा आकडा घटला.
 • २.६ दशलक्ष सिंगापूरवासियांनी या निवडणुकीत मतदान केले.
 • ६८ वर्षीय ली हिसियन लूंग हे २००४ पासून सिंगापूरचे पंतप्रधान आहेत, २०२०ला झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी आपले पद परत मिळविले.
 • पंतप्रधान पदाच्या पहिल्या काळानंतर २१ मे २०११ रोजी त्यांनी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्यांचे वडील ‘ली क्वान यू’ हे सिंगापूरचे पंतप्रधान होते.

ली हिसियन लूंग यांच्याबद्दल थोडक्यात –

  • ली हे पिपल्स अ‍ॅक्शन पार्टी (PAP) चे सरचिटणीस आहेत.
  • त्यांनी २००६, २०११, २०१५ आणि २०२० मध्ये सलग चार सिंगापूर सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयांवर (पीएपी) चे नेतृत्व केले.
  • १९८४ मध्ये प्रथम ते खासदार म्हणून निवडून आले आणि नुकत्याच ‘अंग मो किओ’ गटाचे प्रतिनिधित्व करताना आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले.
  • पंतप्रधान होण्यापूर्वी ली यांनी उपपंतप्रधान, अर्थमंत्री, व्यापार व उद्योगमंत्री आणि दुसरे संरक्षणमंत्री या नात्याने मंत्रीपदाच्या अनेक नेमणुका केल्या.
  • १९९८ ते २००४ पर्यंत ते सिंगापूरच्या चलनविषयक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
  • राजकारणात येण्यापूर्वी ली यांनी ब्रिगेडिअर जनरल म्हणून सेवा बजावली होती.

 

 • ली हिसियन लूंग यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा

 

 • जन्म – १० फेब्रुवारी १९५२
 • पक्ष – पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी (PAP)
 • १९७१ – SAFTI मध्ये पूर्ण अधिकारी कॅडेट कोर्स आणि SAF मध्ये द्वितीय लेफ्टनंट म्हणून कमिशन केलेले अधिकारी
 • १९७८-७९ – अमेरिकेच्या फोर्ट लेव्हनवर्थ येथे US आर्मी कमांडचे शिक्षण
 • १९८३-८४ – सह संचालन व योजना संचालनालयाचे संचालक
 • १९८२-८४ – जनरल चीफ ऑफ स्टाफ
 • १९८४ – खासदार म्हणून निवडून (१९८८, १९९१, १९९७, २००१, २००६ आणि २०११ मध्ये पुन्हा निवडून आले.)
 • १९८६-८९ – सदस्य, पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची केंद्रीय कार्यकारी समिती.
 • १९८९-९२ – PAP चे द्वितीय सहाय्यक सरचिटणीस
 • १९९२-२००४ – PAP चे प्रथम सहाय्यक सरचिटणीस
 • २००४ – PAP चे सरचिटणीस
 • १९८४-८७ – व्यापास व उद्योग व संरक्षण मंत्रालय राज्यमंत्री
 • १९८७ – १९९० – दुसरे संरक्षणमंत्री
 • १९९० – २००४ – उपपंतप्रधान
 • १९९८ – २००४ – अध्यक्ष, सिंगापूरचे नाणेक प्राधिकरण
 • २००१ – २००७ – अर्थमंत्री
 • २००४ – २०२० – पंतप्रधान

Contact Us

  Enquire Now