लांब उडीपटू श्रीशंकर ऑलिम्पिकसाठी पात्र

लांब उडीपटू श्रीशंकर ऑलिम्पिकसाठी पात्र

  • लांब उडीपटू मुरली श्रीशंकर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय थलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने स्वत:च्या राष्ट्रीय विक्रमाच्या कामगिरीत सुधारणा करीत हे यश मिळवले आहे.
  • पुरुष लांब उडीच्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी ८.२२ मीटर अंतराचे निकष होते. पण केरळच्या २१ वर्षीय श्रीशंकरने पाचव्या प्रयत्नात ८.२६ मीटर अंतर गाठून २०१८ मधील ८.२० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडित काढला.
  • केरळच्या मुहम्मद अनीस याहियाने (८ मीटर) रौप्य आणि कर्नाटकच्या एस. लोकेशन (७.६० मीटर) कांस्यपदक पटकावले.
  • श्रीशंकरने २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ८.२० मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता.

Contact Us

    Enquire Now