
लष्कर उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती
- लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती यांनी १ फेब्रुवारी रोजी लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला.
- सध्या लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी हे लष्कराचे उपप्रमुख असून ते या महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मोहंती यांची निवड होणार आहे.
- मोहंती हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी लष्करातील दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक या पदकांनी सन्मानित करण्यात आले.
- मोहंती यांचा जन्म २६ जुलै १९६३ रोजी ओदिशामधील जगतसिंगपूर येथे झाला. त्यांचे वडील शासकीय अधिकारी तर आई प्राध्यापिका होत्या.
- ते लष्कराच्या रजपूत रेजिमेंट या पायदळ तुकडीचे अधिकारी असून जम्मू-काश्मिर व ईशान्य भारताच्या सीमाभागात लष्करी मोहिमा, प्रशासन आणि रसदसेवा अशा विविध विभागांतील कामाचा त्यांना अनुभव आहे.
- डोकलाम प्रश्नाबाबत असलेल्या ईस्टर्न थिएटर येथील महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी अनेक विदेशी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रामुख्याने काँगो येथे विविध राष्ट्रांच्या सैन्य तुकडीचे प्रमुख, सेशेल्स सरकारचे सैन्य सल्लागार आणि संरक्षण मंत्रालयातील विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.