लष्कराच्या तिन्ही दलाचे एकत्रित मुख्यालय-
- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त हा निर्णय घेण्यात आला असे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सांगितले.
- भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाच्या एकात्मिकतेसाठी ‘जॉइंट थिएटर कमांड’ (तिन्ही दलांचे एकत्रित असलेले मुख्यालय) उभारण्यात येणार आहे.
- सैन्य, नौदल आणि हवाई दल यामध्ये समन्वय साधण्यासाठी व्यापक अभ्यास सुरू आहे व विविध देशांच्या लष्करी संरक्षण याची माहिती घेण्यात येत आहे.
- संभाव्य धोके व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान यांचा सातत्याने आढावा घेतला जात असून लष्कराला भविष्यातील सर्व आव्हानासाठी तयार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
- लष्कराची ताकद वाढवण्यासाठी युद्ध कौशल्यांचा विकास, मित्र देशांसोबत लष्करीसराव, आधुनिक शस्त्रांची निर्मिती व तसेच निर्यातीसाठी प्रोत्साहन इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
- जगातील अत्याधुनिक लष्कर म्हणून भारतीय लष्कराची ओळख निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार व तसेच लष्कराचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जात आहे.
- दक्षिण मुख्यालय अंतर्गत असलेल्या ११ राज्य व ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये किनारपट्टीचा मोठा भाग आहे, त्यामुळे भविष्यात सागरी सुरक्षिततेची आव्हाने पेलण्यासाठी नौदल व कोस्टगार्डला मदत कार्य करण्यासाठी दक्षिण मुख्यालय सज्ज आहे.
- पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक लवकरच नवीन स्वरूपात सुरू करण्यात येणार असून ते सर्व पुणेकरांना समर्पित करण्यात येणार आहे, ज्याने प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक लष्करात दाखल होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- कोरोनालसीकरण मोहिमेअंतर्गत लष्करामध्येही लसीकरण सुरू झाले आहे व आतापर्यंत लष्करी वैद्यकीय सेवेतील ६००० आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
- दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख असलेले लेफ्टनंट सी. पी. मोहंती लवकरच भारतीय लष्कर उपप्रमुख म्हणून दिल्लीत कार्यभार सांभाळणार आहेत.