लडाखमधील उमलिंगला खिंड येथे जगातील सर्वात उंच रोड

लडाखमधील उमलिंगला खिंड येथे जगातील सर्वात उंच रोड

  • सीमा सडक संघ (बीआरओ) ने प्रतिकूल हवामानाचा सामना करत पूर्व लडाखमधील उमलिंगला येथे १९,३०० फूट उंचीवर रस्ता बांधून पूर्ण केला आहे.
 • महत्त्वाच्या बाबी:
  • ५२ किमी लांबीच्या या रस्त्यामुळे पूर्व लडाखच्या चुमार सेक्टरमधील महत्त्वाची शहरे जोडली जाणार असून लेह ते चीसूमले, डेमचोकसाठी हा सरळ, पक्का रस्ता झाला आहे.
  • या रस्त्याने बोलिव्हिया मधील रस्ता उंडूरुंकू नावाच्या ज्वालामुखीला जोडणारा १८,९५३ फूट उंचीवरच्या रस्त्याचे रेकॉर्ड मोडून हा जगातील सर्वात उंचीवरचा मोटरेबल रस्ता बनला आहे.
  • हिमांक प्रकल्पांतर्गत बांधलेल्या या रस्त्यामुळे लडाखमधील सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल व पर्यटनास चालना मिळेल.
  • हा रस्ता प्रत्यक्ष नियंत्रण कक्षेच्या (एलएसी) जवळ असून सैन्य व उपकरणाच्या जलद हालचालींना परवानगी देईल.
 • तुलनात्मक वैशिष्ट्ये:
  • उमलांग खिंडीतील हा रस्ता माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षा अधिक उंचीवर आहे; दक्षिण बेस कॅम्प (नेपाळ) हा १७,५९८ फूट, तर उत्तर बेस कॅम्प (तिबेट) १६,९०० फूट उंचीवर आहेत.
  • १७,७०० फूट उंचावरील सियाचीन ग्लोशिअरपेक्षाही अधिक उंचावर हा रस्ता आहे.
  • लेहमधील खारदुंगला खिंड १७,५८२ फूटावर आहे.
 • प्रोजेक्ट हिमांक (Project HIMANK):
  • ‘प्रोझेक्ट हिमांक’ हा बीआरओचा प्रकल्प असून लडाख प्रदेशात राबविला जात आहे.
  • सुरुवात : १९८५
  • या प्रकल्पांतर्गत, बीआरओ जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्त्यांसह संबंधित पायाभूत सुविधांचे बांधकाम व देखभाल करण्यासाठी जबाबदार आहे.

हिमालयातील काही महत्त्वाच्या खिंडी:

क्र. खिंड जोडले जाणारे प्रदेश
बनिहाल जम्मू ते श्रीनगर
चांग ला लडाख – तिबेट
झोझीला लेह आणि श्रीनगर
खार्दुंगला लेह
रोहतांग कुल्लू-लाहूल-स्पिती (हिमाचल प्रदेश)
शिप्कीला हिमाचल प्रदेश आणि तिबेट
लिपू लेख उत्तराखंड-तिबेट-नेपाळ सीमा (कैलास मानसरोवर)
नथु ला सिक्कीम – तिबेट
झलेप ला सिक्कीम – भूतान सीमा
१० बोमडी ला अरुणाचल प्रदेश – भूतान
११ दिहांग अरुणाचल प्रदेश – म्यानमार

Contact Us

  Enquire Now