लक्ष्मी विलास बँकेच्या डीबीएसमध्ये विलीनीकरणास मंजुरी
- खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या ‘डीबीएस इंडिया’ बँकेतील विलीनीकरणास 25 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
- यासाठी डीबीएसने 2500 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
- पंजाब नॅशनल बँक व येस बँक नंतरची आर्थिक संकटात सापडलेली लक्ष्मी विला बँक ही यावर्षातील तिसरी बँक आहे.
- अवाजवी कर्जेवाटप, वाढती थकबाकी यांमुळे कमी तरलता आणि भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR – Capital Adequacy Ratio) गाठवण्यास ही बँक असमर्थ ठरली.
- या विलीनीकरणामुळे
- रिझर्व्ह बँकेने प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन अंतर्गत लक्ष्मी विलास बँकेवर घातलेली निर्बंध काढण्यात आले आहेत.
- या बँकेच्या सर्व 500हून अधिक शाखा या डीबीएस इंडिया बँकेच्या शाखा म्हणून कार्यान्वित होतील.
- डीबीएस समूहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- यामुळे लक्ष्मी विलास बँकेचा असलेला 0.17% CAR 12.5% पर्यंत वाढण्याची शक्यता.
- विलीनीकरणास विरोध – बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना
- संघपरिवारातील स्वदेशी जागरण मंच
- इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीबरोबरचा विलीनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयने फेटाळला होता.
- महत्त्वाचे –
- CAR – (Capital Adequacy Ratio) : बँकांच्या एकूण भांडवल आणि बँकांची जोखीमभारित संपत्ती यांचे प्रमाण
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेसल – III 2011 निकषानुसार बँकांचा CAR 9% असणे अपेक्षित असते.
- लक्ष्मी विलास बँक –
- स्थापना – 1926
- मुख्यालय – चेन्नई, तामिळनाडू
- CEO – सुब्रमण्यम सुंदर
- डीबीएस बँक (Development Bank of Singapore)
- स्थापना – 2003 (1968 – 2003 : DBS Bank Ltd.)
- मुख्यालय – सिंगापूर