रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि भारतीय नौदलाचा द्विपक्षीय सराव ‘ऑसिन्डेक्स’
- भारतीय नौदलाच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेले जहाज शिवालिक आणि कदमत, पूर्व ताफ्याचे प्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर अडमिरल तरुण सोबती यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर २०२१ दरम्यान होणाऱ्या ऑसिन्डेक्सच्या (AUSINDEX) चौथ्या आवृत्तीत भाग घेत आहेत.
- रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) अनझॅक क्लास गेट, एचएमएएस वारामूंगा ज्यांनी भारतीय नौदलासह मलबार सरावात भाग घेतला होता, ते या सरावात भाग घेत आहेत.
- ऑसिन्डेक्सच्या सरावामध्ये जहाज, पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि सहभागी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या सागरी गस्तीच्या विमानामधील हवाई ऑपरेशन्स यांचा समावेश आहे.
- भारतीय नौदलाची सहभागी होणारी जहाजे शिवालिक आणि कदमत ही अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची आणि स्टील्थ फ्रिगेट आणि ॲण्टिसबमरीन कॉर्वेट पद्धतीचे आहेत.
- २०१५ मध्ये ऑसिन्डेक्सच्या सरावास सुरुवात
- २०१९ मध्ये बंगालच्या उपसागरात आयोजित केलेल्या ऑसिन्डेक्सच्या तिसऱ्या आवृत्तीत प्रथमच पाणबुडीविरोधी सरावांचा समावेश केला.
- हा महत्त्वाचा सराव दोन राष्ट्रांमधील २०२० व्यापक धोरणात्मक भागीदारीशी संबंधित आहे.
- हिंद प्रशांत क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्याचे उद्देश आहे.