राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२०-२१ चे जीडीपीचे पहिले आगाऊ अंदाजपत्रक केले जाहीर
- केंद्रिय अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यापूर्वी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) जीडीपीचे अग्रिम अंदाजपत्रक जारी करते.
- एनएसओच्या या पहिल्या अग्रिम अंदाजपत्रकात देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ७.७ टक्क्यांनी घसरेल, असे स्पष्ट केले आहे.
- २०१९-२० मध्ये आर्थिक वाढीचा दर ४.२ टक्के होता.
- स्वातंत्र्योत्तर भारतात १९७९ – ८० मध्ये जीडीपीचा दर उणे ५.२४ टक्के होता. त्यानंतरचा यंदाचा उणे ७.७ टक्क्यांचा अंदाज, भारतातील तीव्र स्वरूपाचे आकुंचन ठरेल.
- एनएसओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य २०११-१२ प्रमाणे २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात १३४.४० लाख कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे.
- गतवर्षी २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार १४५.६६ लाख कोटी असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
- खालील तक्ता २०२०-२०२१ मधील मागणी व पुरवठा बाजूने होणारा वास्तविक जीडीपीचा विकासदर दर्शवितो : (२०११-१२च्या किंमतींना आधार मानून)
मागणी बाजू जीडीपी | वास्तविक वाढ (%) (२०२०-२१) | पुरवठा बाजू जीडीपी | वास्तविक वाढ (%) (२०२०-२१) |
खासगी उपभोग |
९.५ | शेती | ३.४ |
सरकारी उपभोग |
५.८ |
खाणकाम |
१२.४ |
निश्चित गुंतवणूक |
१४.५ | युटिलिटीज (वीज, गॅस, पाणीपुरवठा) | २.७ |
निर्यात |
८.३ | निर्मिती |
९.४ |
आयात |
२०.५ | बांधकाम |
१२.६ |
सेवा |
८.८ |
- इतर काही संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था किती टक्क्यांनी घसरेल याचे अंदाज वर्तविले आहे, ते पुढीलप्रमाणे
अ) वर्ल्ड बँक – ९.६%
ब) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी – १०.३%
क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया – ७.५%
- कोरोना कहर आणि नंतरच्या सक्तीच्या टाळेबंदीमुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील भीषण घसरणीचा अंदाज करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (National Statistical Office)
- RBI चे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) आणि केंद्रिय सांख्यिकी कार्यालय (NSO) यांची विलीनीकरण करून एनएसओची स्थापना करण्यात आली.
- NSO प्रमुख : सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाचे सचिव
CSO (Central Statistical Office)
- स्थापना – १९५१
- कार्य – राष्ट्रीय उत्पन्न, औद्योगिक उत्पादन, महागाई यांसबंधित माहितीचे संकलन
- ग्राहक किंमत निर्देशांक (CPI), औद्योगिक उत्पन्न निर्देशांक (IIP) मोजणे
NSSO (National Statistical Survey Office)
- स्थापना – १९५०
कार्य – उपभोग खर्च, रोजगार, बेरोजगारी यांचा नमुना सर्वेक्षण अहवाल तयार करणे.