राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF)
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (National Institutional Ranking Framework : NIRF) द्वारे त्यांची गुणवत्ता यादी ९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केली.
- या गुणवत्ता यादीला इंडिया रॅकिंग्ज २०२१ असे नाव देण्यात आले आहे.
- आवृत्ती : सहावी
इंडिया रँकिग्ज २०२१च्या सहाव्या आवृत्तीची वैशिष्ट्ये :
१) आयआयटी-मद्रास, आयआयएससी-बंगळूरू, आयआयटी मुंबई या देशातील सर्वोत्तम तीन शिक्षण संस्था आहेत.
२) सर्वोत्तम महाविद्यालय श्रेणीअंतर्गत दिल्ली विद्यापीठाचे मिरांडा कॉलेज यंदाही प्रथम स्थानावर आहे.
३) मागील वर्षी तिसऱ्या स्थानावर असलेले आयआयटी दिल्ली आता चौथ्या स्थानावर आहे.
४) या गुणवत्ता यादीनुसार शैक्षणिक संस्थांचे किंवा विद्यापीठांचे वर्गीकरण यावर्षी ११ गटात करण्यात आलेले आहे, यात संशोधन गटातील शैक्षणिक संस्थांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
५) २०२० मध्ये दंतवैद्यक शास्त्र गटातील (Dental) संस्थांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता.
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF : National Institutional Ranking Framework)
- सन २०१६ पासून केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाद्वारे ही क्रमवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा शिक्षण मंत्रालयाद्वारे डिजिटल स्वरूपात ही यादी जाहीर करण्यात आली.
ही क्रमवारी निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारे मापदंड :
१) अध्ययन – अध्यापन व शैक्षणिक संसाधने (Teaching, Learning and Resources)
२) संशोधन आणि व्यावसायिक अभ्यास (Research and Professional Practice)
३) पदवी निष्पत्ती (Graduation Outcome)
४) व्याप्ती आणि सर्वसमावेशकता (Outreach and Inclusivity)
५) दृष्टिकोन (Perception)
-
- या क्रमवारीचे वर्गीकरण ४ श्रेणी (सर्वसाधारण, महाविद्यालय, विद्यापीठ आणि संशोधन) व ७ विषय गटात (अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, विधी, दंतवैद्यकशास्त्र) असे एकूण ११ गटांत केले जाते.
- यंदाच्या क्रमवारीत अभियांत्रिकी गटात २०० संस्था, सर्वसाधारण, विद्यापीठ व महाविद्यालय श्रेणीत प्रत्येकी १०० संस्था, व्यवस्थापन आणि औषधनिर्माण गटात प्रत्येकी ७५ संस्था, वैद्यकीय आणि संशोधन गटात प्रत्येकी ५०, दंतवैद्यकशास्त्र गटात ४०, विधी गटात ३० आणि स्थापत्यशास्त्र गटात २५ संस्थांचा समावेश होता.
गटनिहाय सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था
अ) सर्वसाधारण (Overall)
क्र. | संस्था | शहर | राज्य | गुण |
१. | आयआयटी | मद्रास | तमिळनाडू | ८६.७३ |
२. | आयआयएससी | बंगळूरू | कर्नाटक | ८३.६७ |
३. | आयआयटी | मुंबई | महाराष्ट्र | ८२.५२ |
४. | आयआयटी | नवी दिल्ली | दिल्ली | ८१.७५ |
५. | आयआयटी | कानपूर | उत्तर प्रदेश | ७६.५० |
ब) विद्यापीठ गट
क्र. | संस्था | शहर | राज्य | गुण |
१. | Indian Institute of Sciences (आयआयएससी) | बंगळूरू | कर्नाटक | ८२.६७ |
२. | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ | नवी दिल्ली | दिल्ली | ६७.९९ |
३. | बनारस हिंदू विद्यापीठ | वाराणसी | उत्तर प्रदेश | ६४.०२ |
क) महाविद्यालय क्रमवारी
क्र. | संस्था | शहर | राज्य |
१. | मिरांडा हाऊस | दिल्ली | दिल्ली |
२. | लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन | दिल्ली | दिल्ली |
३. | लॉयला कॉलेज | चेन्नई | तमिळनाडू |
ड) संशोधन श्रेणी
क्र. | संस्था | शहर | राज्य |
१. | आयआयएससी | बंगळूरू | कर्नाटक |
२. | आयआयटी | मद्रास | तमिळनाडू |
३. | आयआयटी | मुंबई | महाराष्ट्र |
इतर सात गट व त्यातील भारतातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था :
क्र. | गट | सर्वोत्कृष्ट संस्था | शहर | राज्य | गुण |
१. | अभियांत्रिकी | आयआयटी | मद्रास | तमिळनाडू | ९०.१९ |
२. | व्यवस्थापन | आयआयएम | अहमदाबाद | गुजरात | ८३.६९ |
३. | औषधनिर्माण | जामिया हमदर्द | नवी दिल्ली | दिल्ली | ७८.५२ |
४. | वैद्यकीय | ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) | नवी दिल्ली | दिल्ली | ९२.०७ |
५. | स्थापत्यशास्र | आयआयटी | रुरकी | उत्तराखंड | ८२.६५ |
६. | विधी | नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी | बंगळूरू | कर्नाटक | ७८.०६ |
७. | दंतवैद्यकशास्त्र | मणिपाल कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस | उडुपी | कर्नाटक | ७४.३० |
एनआयआरएफ आणि महाराष्ट्र :
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वसाधारण गटात २० वा तर विद्यापीठांच्या गटात अकरावा क्रमांक पटकावला आहे.
२) देशभरातील दहा सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रातील एकही विद्यापीठाला स्थान मिळाले नाही.
३) विद्यापीठ गटातील १०० विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील एकूण १२ विद्यापीठांचा समावेश असून त्यातील मुंबईतील एकूण ६ पुण्यातील एकूण ४ तर वर्धा आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी एका विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले आहे.
४) सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील एकूण १२ शिक्षणसंस्थांना स्थान मिळाले आहे. या यादीत सर्वाधिक संस्थांच्या बाबतीत महाराष्ट्राचा तामिळनाडूनंतर (१९) दुसरा क्रमांक लागतो.