राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान व्यासपीठ-
- शिक्षकांचे तंत्र कौशल्य वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचा ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचा मानस आहे.
- ऑनलाइन वर्गाशी जुळवून घेताना शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची गरज समोर आलेली आहे.
- यासाठीचा मसुदा जाहीर करण्यात आला असून ६ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना सूचना व आक्षेप नोंदवता येतील.
- शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे व्हावा आणि सर्वांना योग्य प्रकारे त्या सुविधा मिळाव्यात यासाठी हे व्यासपीठ आहे.
- महाविद्यालयाबरोबरच शाळांसाठीही या व्यासपीठाच्या माध्यमातून संकल्पना सुचवणे, सुविधांचे व्यवस्थापन, नियोजन, मूल्यांकन, अध्ययन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
- या कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक, विषयतज्ज्ञ, उद्योजक, उच्चपदस्थ यांना आमंत्रित केले आहे.