राष्ट्रीय पंचायतराज दिन
- भारतात दरवर्षी २४ एप्रिलला राष्ट्रीय पंचायतराज दिन साजरा करण्यात येतो.
- हा दिवस साजरा करण्यास सन २०१० पासून सुरुवात झाली.
- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीला राज्यघटनेमध्ये पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा नव्हता. ७३ वी घटनादुरुस्ती, १९९२ ने पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्यात आला. या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी. २४ एप्रिल १९९३ पासून सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय पंचायतराज दिवस म्हणून निवडण्यात आला.
भारतातील स्थानिक स्वराज संस्थांचा विकास :
- स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड रिपन याने १२ मे १८८२ रोजी भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचा कायदा केला.
- लॉर्ड रिपनला ‘भारतीय स्थानिक स्वराज संस्थांचा जनक’ म्हणून ओळखले जाते.
- १९५७ साली नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीच्या अहवालात प्रथमच लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पंचायत राज्याची संकल्पना मांडण्यात आली. ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थेला ‘पंचायतराज’ हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले. सर्वप्रथम राजस्थान सरकारने बलवंतराय समितीच्या सूचना विचारात घेऊन २ ऑक्टोबर १९५९ रोजी पंचायतराज प्रणाली राजस्थान राज्यातल्या नागौर या जिल्ह्यात स्वीकारली गेली.
- १९९२ मध्ये ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्थांना सांविधानिक दर्जा दिला. हा कायदा २४ एप्रिल १९९३ रोजी लागू झाला.
- ७४ व्या घटनादुरुस्तीने शहरी स्थानिक स्वराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.
- या घटना दुरुस्त्यांनी प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाळ ५ वर्षे करण्यात आला.
- पंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.
- या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्र पंचायतराज स्वीकारणारे नववे राज्य होते.
- ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा – १९६१’ हा कायदा नाईक समितीच्या शिफारसींवरून करण्यात आला.
क्र. पंचायतराज संदर्भातील महत्त्वाच्या समित्या स्थापना अहवाल
१. बलवंतराय मेहता समिती (भारतासाठी) ६ जानेवारी १९५७ १९५८
२. अशोक मेहता समिती (भारत) १९७७ १९७८
३. वसंतराव नाईक समिती (महाराष्ट्र राज्यासाठी) १९६० १९६१
४. ल. ना. बोंगिरवार समिती (महाराष्ट्र) १९७० १९७१
५. बाबूराव काळे समिती (महाराष्ट्र) १९८० १९८१
६. पी. बी. पाटील समिती (१९८४) १९८४ १९८६