राष्ट्रीय जल पुरस्कार
का महत्त्वाचे?
- राष्ट्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येतो.
- या अंतर्गत उत्तर प्रदेशने जलसंधारणाच्या प्रयत्नांसाठी प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तसेच राजस्थान व तमिळनाडू अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर आहे.
महत्त्वाचे :
१) जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागातर्फे या पुरस्काराचे आयोजन केले जाते.
२) जलशक्ती मंत्रालयाने हा पुरस्कार २०१८ पासून देण्यास सुरुवात केली.
३) जलशक्ती मंत्रालय देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेले चांगले काम आणि प्रयत्न आणि ‘जल समृद्ध भारत’ सरकारच्या दृष्टीकोनावर लक्ष केंद्रीत करतात.
जलसंधारण आणि व्यवस्थापनाची गरज
१) पाण्याच्या अतिवापरामुळे जलस्रोतांचा र्हास आणि हवामान बदलामुळे पाणीपुरवठ्यात होणारी घट भारताला पाणी टंचाईच्या टोकाला नेत आहे.
२) भारताची सध्याची पाण्याची गरज प्रतिवर्षी अंदाजे १,१०० अब्ज घनमीटर्स आहे. जी २०५० पर्यंत १,४४७ अब्ज घनमीटर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
३) जगाच्या लोकसंख्येच्या १६% भारताचा वाटा आहे. पण जगातल्या गोड्या पाण्याच्या संसाधनापैकी फक्त ४% देशाकडे आहे. बदलत्या हवामान पद्धती आणि वारंवार पडणार्या दुष्काळामुळे भारतावर पाण्याचा ताण आहे.
४) सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड (CGWB) नुसार, भारतातील शेत जमिनीच्या सिंचनासाठी दरवर्षी २३० अब्ज मीटर्स घन भूजल काढले जाते.