राष्ट्रीय खाद्यतेल मिशन- ऑईल पाम

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन- ऑईल पाम

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय खाद्यतेल मिशन- ऑईल पाम: (NMEO-OP) ची घोषणा केली.
 • यासाठी खाद्यतेल परिसंस्थेत पाच वर्षांसाठी ११ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाईल.

योजनेची वैशिष्ट्ये:

 • उद्दिष्ट: खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णता सुनिश्चित करणे.
 • उद्देश: देशांतर्गत खाद्यतेलाचे उत्पादन १०.५ दशलक्ष टनांवरून १८ दशलक्ष टनांपर्यंत म्हणजेच ७० टक्के वाढीसह २०२४-२५पर्यंत आयात अवलंबित्व ६० टक्‍क्‍यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत कमी करणे.
 • यासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व आवश्यक सुविधा तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातील.
 • पाम तेल लागवडीला प्रोत्साहन देण्यासह हे मिशन पारंपरिक तेलबियांच्या लागवडीचाही विस्तार करेल.
 • अनुकूल हवामानामुळे या योजनेचा विशेष भर भारताच्या ईशान्येकडील राज्ये आणि अंदमान-निकोबार बेटांवर असेल.

योजनेची आवश्यकता:

 • भारत जगातील सर्वात मोठा वनस्पती तेलाचा ग्राहक आहे.
 • भारताच्या एकूण वनस्पती तेलाच्या जवळपास ६० टक्के आयात ही पाम तेलाची आहे.
 • २०१६-१७ मध्ये भारतात पाम तेलाचा एकूण देशांतर्गत वापर ९.३ दशलक्ष मेट्रिक टन होता, त्यातील ९८.९७ टक्के पामतेल मलेशिया आणि इंडोनेशिया येथून आयात केले होते.
 • याचाच अर्थ भारत त्याच्या गरजेचा केवळ १.०२७ टक्के पाम तेलाचे उत्पादन करतो.
 • भारतात ९४.१ टक्के पाम तेल विशेषत: स्वयंपाकासाठी वापरली जाते, त्यामुळे भारताच्या खाद्यतेल अर्थव्यवस्थेत पाम तेल अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पाम तेलाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे.

पाम तेल:

 • सध्या जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे तेल.
 • वापर: डिटर्जंट, प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने तसेच जैवइंधन उत्पादनात मोठ्या प्रमाणावर पाम तेलाचा वापर केला जातो.
 • सर्वाधिक उपभोक्ता देश: भारत, चीन, युरोपियन युनियन.

इतर:

 • मे २०२० मध्ये तेलबियांचे उत्पादन २०१४-१५ मधील २७.५ दशलक्ष टनांपासून ३५ टक्क्यांनी वाढून २०२०-२१ पर्यंत ३७.३ दशलक्ष टन झाले होते.

Contact Us

  Enquire Now