राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : २०२०

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार : २०२०

    • क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. केेंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने सन २०२० चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.
    • सर्वोच्च न्यायालयातील माजी न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार तब्बल ७३ व्यक्तींना ७ वेगवेगळ्या गटांत पुरस्कार जाहीर करण्यात आले.
    • यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद पारितोषिक, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
    • २९ ऑगस्ट २०२० रोजी हे पुरस्कार राष्ट्रपती भवनातून आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारार्थींना देण्यात आले.

 

  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :

 

  • चार वर्षे क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येतो.
  • क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
  • यावर्षी खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंची निवड खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली.
  • क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे.
  • पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ
  • सुरुवात : १९९२ पासून
  • स्वरूप : पदक व रोख रक्कम रु. २५ लाख व मानचिन्ह.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान (२९ ऑगस्ट)

२०१९ चे विजेते :

१. बजरंग पुनिया (कुस्ती)

२. दीपा मलिक (पॅरा अ‍ॅथलिट)

२०२० चे एकूण पाच विजेते खालीलप्रमाणे ः

क्र. खेळाडूचे नाव क्रीडा शाखा
श्री. रोहित शर्मा क्रिकेट
श्री. मरियप्पन टी. पॅरा अ‍ॅथलेटिक्स
कु. मनिका बात्रा टेबल टेनिस
कु. विनेश फोगट कुस्ती
कु. राणी रामपाल हॉकी
  1. A) रोहित शर्मा – क्रिकेटपटू – महाराष्ट्र – हा मानाचा पुरस्कार मिळविणारा चौथा क्रिकेटपटू
  • या आधी सचिन तेंडुलकर (१९९८), महेंद्रसिंह धोनी (२००७) विराट कोहली (२०१८) यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
  • २०१९ च्या विश्वचषकात रोहित शर्मा ५ शतक झळकावत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
  • २०१५ अर्जुन पुरस्कार
  1. B) पॅरा अ‍ॅथलेटिक खेळाडू मरीअप्पम थंगवेलू (तमिळनाडू)
  • उंच उडी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो.
  • रिओ २०१६ च्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत, उंच उडीमध्ये सुवर्णपदक
  • २०१७ – अर्जुन पुरस्कार
  • २०१७ – पद्मश्री पुरस्कार
  • २०१८ च्या जकार्ता येथील आशियाई पॅरा स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक
  1. C) मनिका बात्रा – टेबल टेनिस – (दिल्ली)
  • २०१८ – आशियाई स्पर्धा (जकार्ता) – कांस्यपदक
  • २०१८ – राष्ट्रकूल स्पर्धा (गोल्ड कोस्ट) – एकूण चार पदके
  • महिला संघ आणि एकेरीमध्ये सुवर्णपदक
  • दुहेरी मध्ये – रौप्यपदक
  • मिश्र दुहेरी मध्ये – कांस्य पदक
  • २०१८ – अर्जुन पुरस्कार
  1. D) विनेश फोगट – कुस्ती – (हरियाणा)
  • कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत पदके मिळविणारी पहिली महिला कुस्तीपटू
  • २०१६ – अर्जुन पुरस्कार
  • २०१८ – पद्मश्री
  1. E) राणी रामपाल – हॉकी (हरियाणा)
  • भारतीय हॉकी संघाची कर्णधार
  • २०२० – पद्मश्री
  • हा पुरस्कार मिळविणारी पहिली महिला हॉकीपटू

द्रोणाचार्य पुरस्कार:

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणार्‍या खेळाडूंना प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांसाठी हा पुरस्कार केंद्र सरकारकडून दोन श्रेणीत (आजीवन आणि नियमित श्रेणीत) दिला जातो.
  • हा पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन – भालचंद्र भागवत (कुस्ती (१९८५)) 
  • सुरुवात : १९८५
  • स्वरूप : द्रोणाचार्यांचा कांस्य पुतळा, रोख रक्कम रुपये १५ लाख, पदक व मानचिन्ह.
  • २०२० मध्ये दोन श्रेणीत १३ खेळाडूंना जाहीर करण्यात आला.
क्र. खेळाडूचे नाव क्रीडा शाखा
नियमित श्रेणी
श्री. ज्यूड फेलिक्स सेबस्टियन हॉकी
श्री. योगेश मालवीय मल्लखांब
श्री. जसपाल राणा नेमबाजी
श्री. कुलदीप कुमार हंदू वुशू
श्री. गौरव खन्ना पॅरा बॅडमिंटन
आजीवन श्रेणी
श्री. धर्मेंद्र तिवारी धनुर्विद्या
श्री. पुरुषोत्तम राय अ‍ॅथलेटिक्स
श्री. शिव सिंग मुष्टियुद्ध
श्री. रोमेश पठानिया हॉकी
श्री. कृष्णकुमार हुडा कबड्डी
श्री. विजय भालचंद्र मुनीश्वर पॅरा पॉवरलिफ्टिंग
श्री. नरेश कुमार टेनिस
श्री. ओम प्रकाश दहिया कुस्ती

अर्जुन पुरस्कार :

  • क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार
  • सुरुवात १९६१ पासून.
  • स्वरूप : अर्जुनाचा कांस्य पुतळा, १५ लाख रुपये, प्रशस्तिपत्र 
  • २०२० मध्ये २७ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
क्र. खेळाडूचे नाव क्रीडा शाखा
श्री. अंतु दास धनुर्विद्या
कु. द्युती चंद अ‍ॅथलेटिक्स
श्री. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी बॅडमिंटन
श्री. चिराग चंद्रशेखर शेट्टी बॅडमिंटन
श्री. विशेष भृगुवंशी बास्केटबॉल
सुबेदार मनीष कौशिक मुष्टियुद्ध
कु. लवलिना बोरगोहेन मुष्टियुद्ध
श्री. इशांत शर्मा क्रिकेट
कु. दीप्ती शर्मा क्रिकेट
१० श्री. सावंत अजय अनंत अश्वारोहण
११ श्री. संदेश झिंगन फूटबॉल
१२ कु. अदिती अशोक गोल्फ
१३ श्री आकाशदीप सिंग हॉकी
१४ कु. दीपिका हॉकी
१५ श्री. दीपक कबड्डी
१६ कु. काळे सारिका सुधाकर खो-खो
१७ श्री. दत्तू बबन भोकनळ रोइंग
१८ कु. मनू भाकर नेमबाजी
१९ श्री. सौरभ चौधरी नेमबाजी
२० कु. मधुरिका सुहास पाटकर टेबल टेनिस
२१ श्री. द्विविज शरण टेनिस
२२ श्री. शिवा केशवन विंटर  स्पोर्टस्
२३ कु. दिव्या काकरन कुस्ती
२४ श्री. राहुल आवारे कुस्ती
२५ श्री. सुयश नारायण जाधव पॅरा स्विमिंग
२६ श्री. संदीप पॅरा अ‍ॅथलेटिक्स
२७ श्री. मनीष नारवाल पॅरा शूटिंग

ध्यानचंद पुरस्कार :

  • संपूर्ण कारकीर्दीत उत्कृष्ट खेळ करणार्‍या खेळाडूंना केंद्रसरकारमार्फत.
  • हा पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय – मारुती माने (२००५)
  • सुरुवात : २००२ पासून.
  • स्वरूप : ध्यानचंदांची मूर्ती, प्रशस्तिपत्र, १० लाख रुपये रोख.
  • २०२० मध्ये १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. 
क्र. खेळाडूचे नाव क्रीडा शाखा
श्री. कुलदीपसिंह भुल्लार अ‍ॅथलेटिक्स
कु. जिन्सी फिलिप्स अ‍ॅथलेटिक्स
श्री. प्रदीप श्रीकृष्ण गंधे बॅडमिंटन
कु. तृप्ती मुरगुंडे बॅडमिंटन
कु. एन. उषा मुष्टियुद्ध
श्री. लाखा सिंग मुष्टियुद्ध
श्री. सुखविंदर सिंग संधू फूटबॉल
श्री. अजित सिंग हॉकी
श्री. मनप्रित सिंग कबड्डी
१० श्री. जे. रंजित कुमार पॅरा अ‍ॅथलेटिक्स
११ श्री. सत्यप्रकाश तिवारी पॅरा बॅडमिंटन
१२ श्री. मनजित सिंग रोईंग
१३ कै. श्री. सचिन नाग स्विमिंग
१४ श्री. नंदन पी. बाल टेनिस
१५ श्री. नेत्रपाल हुडा कुस्ती

 

तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०१९

  • केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०१९ देण्यात आला. 
  • जमीन, समुद्र आणि हवेतील अतिविशिष्ट साहसासाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • विविध साहसी प्रकारात एकूण ८ खेळाडूंची निवड करण्यात आली. 
  • प्रथम प्रदान : १९९४
  • स्वरूप : तेनसिंग नोर्गे यांचा कांस्य पुतळा, प्रशस्तिपत्र आणि ५ लाख रुपये.
  • हा पुरस्कार अर्जुन पुरस्काराशी समतुल्य आहे.

२०२० या वर्षाचे विजेते पुढीलप्रमाणे :

क्र. खेळाडूचे नाव क्रीडा शाखा
कु. अनिता देवी लँड अ‍ॅडव्हेंचर
कर्नल सरफराज सिंग लँड अ‍ॅडव्हेंचर
श्री. टाका तामूत लँड अ‍ॅडव्हेंचर
श्री. नरेंद्र सिंग लँड अ‍ॅडव्हेंचर
श्री. केवल हिरेन कक्का लँड अ‍ॅडव्हेंचर
श्री. सत्येंद्र सिंग वॉटर अ‍ॅडव्हेंचर
श्री. गजानंद यादव एअर अ‍ॅडव्हेंचर
कै. श्री. मगन बिस्सा जीवनगौरव

 

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार

  • सुरुवात – १९५६ – ५७
  • क्रीडा क्षेत्रात सर्वंकष कामगिरी करणार्‍या विद्यापीठास २०२० मध्ये पंजाब विद्यापीठ, (चंदीगढ)ला हा पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

२०२० चे पुरस्कार

१) लक्ष्य इन्स्टिट्यूट

२) ONGC Ltd.

३) Air Force Sport Control Board

४) International Institute of Sport Management

Contact Us

    Enquire Now