राष्ट्रीय किसान दिवस
- दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो.
- देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त २००१पासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
चौधरी चरण सिंग यांच्याविषयी:
- जन्म : १९०२ (नुरपुर, मेरठ, उत्तर प्रदेश)
- त्यांनी २८ जुलै १९७९ ते १७ जानेवारी १९८० पर्यंत पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला.
- १९३९ : चरणसिंग यांनी कर्जमुक्ती विधेयक (Debt Redemption Bill) आणले होते.
- १९५२ : उत्तर प्रदेशचे कृषीमंत्री म्हणून चरणसिंह यांनी भारतातील जमीनदारी व्यवस्था रद्द करण्यासाठी कठोर परिश्रम केले होते.
- १९५३ : धारण जमिनीचे एकत्रीकरण कायदा (Consolidation of Land Holdings Act) पारित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. या कायद्यांतर्गत शेतकऱ्यांच्या खंडित जमिनींचे एकत्रीकरण करून त्यांचे शेतकऱ्यांमध्ये अशा पद्धतीने पुन्हा वाटप करणे जेणे करून प्रत्येक शेतकऱ्याला एकच शेत मिळेल.
- ग्रामीण आणि कृषी विकासाचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी शेतीला भारतीय नियोजनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा सतत प्रयत्न केला.
- देशातील कृषी विकास व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘चॅम्पियन ऑफ इंडियाज पीझंट्स’ म्हणूनही ओळखले जाते.
पुस्तके :
१) जमीनदारीचे उच्चाटन (१९४७)
२) सहकारी शेती एक्स (Cooperative Farming X)
३) भारतातील दारिद्र्य आणि त्याचे उपाय (१९६४)
४) भारताचे आर्थिक धोरण – गांधीवादी ब्लूप्रिंट (१९७८)
५) उत्तर प्रदेशातील कृषी क्रांती (१९५७)
भारतातील शेतीचे महत्त्व
- २०१९ च्या स्थिती मूल्यांकन सर्वेक्षणानुसार (SAS) भारतात ९३.१ दशलक्ष ग्रामीण शेतकरी कुटुंबे आहेत.
- शेतात किंवा बागायती पिके, पशुधन अथवा ४००० रुपयांपेक्षा अधिक किमतीचे इतर निर्दिष्ट कृषी उत्पादने घेतली असतील व सर्वेक्षणापूर्वीच्या ३६५ दिवसांत कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार करणार्या सदस्यास शेतकरी कुटुंब म्हणून गणले जाते.
- राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (NSO) अनुसार एकूण अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा स्थूल मूल्यवर्धित उत्पादनातील वाटा
वर्ष | GVA मधील वाटा (%) |
२०१८-१९ | १७.६ |
२०१९-२० | १८.४ |
२०२०-२१ | २०.२ |