राष्ट्रपतींच्या हस्ते २०२१साठी देशव्यापी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा प्रारंभ
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ३० जानेवारी २०२१साठी देशव्यापी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
- राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या उपस्थितीत पाच वर्षाच्या आतल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
- प्रथम महिला सविता कोविंद यांनी पल्स पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या पूर्वसंध्येला मुलांना पोलिओचे थेंब पाजले.
- पल्स पोलिओ मोहिम ३१ जानेवारी २०२१ रोजी संपूर्ण देशभरामध्ये राबविण्यात येणार आहे. हा रविवार ‘पोलिओ रविवार’ म्हणून ओळखला जातो.
- या मोहिमेअंतर्गत देशातल्या १७ कोटी मुलांना पोलिओचे थेंब देण्यात येणार आहेत. देशभरात यासाठी २४ लाख स्वयंसेवक, १.५ लाख निरीक्षक कार्यरत असणार आहे. विविध नागरी समाज संस्था ,जागतिक आरोग्य संघटना, युनिसेक ,रोटरी यासारख्या संस्थांच्या पाठबळाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य सेवक या दिवशी जवळपास दोन कोटी कुटुंबांच्या घरी जाऊन मुलांना डोस पाजणार आहेत.
पोलिओ या रोगाविषयी
पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे. (विषाणू Enterovirus)
प्रसार – दुषित अन्न आणि पाणी
अवयव – मध्यवर्ती चेता संस्था (CNS)
लक्षणे – ताप, घसा लाल होणे, हातपाय लुळे पडणे, अशक्तपणा
उपचार – लस दोन प्रकारच्या
१) Salk ची लस – तोंडाव्दवारे – फक्त Systamic Immunity पुरवते.
२) सेबीनची लस – इंजेक्शनद्वारे – ही लस आतड्याच्या आत जाऊन तिथे पण आणि रक्तात शोषल्या जाऊन शरीरभर प्रतिकार क्षमता पुरवते.
पोलिओ लसीकरण मोहिमेविषयी
- जागतिक स्तराचा विचार केला तर एकूण पोलिओग्रस्तांपैकी भारतामध्ये ६० टक्के प्रकरणे आढळत होती. मात्र सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम डिसेंबर १९९३ मध्ये तयार केला आणि २ ऑक्टोबर १९९४ पासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या दिवशी पोलिओमुक्त भारत करण्यासाठी पहिल्या बालकाला पोलिओचा डोस देण्यात आला. देशातल्या ४००० केंद्रावरून १२ लाख बालकांना डोस देण्यात आला. पल्स पोलिओ कार्यक्रमाचा दृश्य परिणाम १९९५ पासून जाणवू लागला. आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अशाच पद्धतीने पोलिओच्या कार्यक्रमाचे अनुकरण करण्यात आले. दि. १३ जानेवारी २०११ रोजी हावडा येथे देशातला शेवटचा रुग्ण सापडल्याची नोंद आहे. २७ मार्च २०१४ रोजी भारतासह संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया पोलिओमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिले.
- आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी ‘किक पोलिओ आऊट ऑफ आफ्रिका’ ही मोहीम सुरू केली होती.