
रायगडावरील वास्तूंचे तंत्रज्ञानाद्वारे पुनर्निर्माण-
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूचे रेखाचित्र तयार करण्यात येणार आहे.
- यामध्ये पुनर्निर्माणासह डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी भूस्थानिक सूचना प्रणाली भू त्रिमितीय आणि सूचना तंत्रज्ञान अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
- रायगड परिसरातील 21 गावांच्या भौगोलिक माहितीचे संकलन करून विकासाला सुरुवात करण्यात येणार आहे.
- देशात प्रथमच गडाच्या संवर्धन विकासासाठी अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.
- रायगड प्राधिकरण याद्वारे या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे. तसेच हा प्रकल्प महावारसा या नावाने ओळखला जाणार आहे.