रायगडमध्ये ट्रायफेड प्रकल्प

रायगडमध्ये ट्रायफेड प्रकल्प

 • केंद्रीय आदिवासी कामकाजमंत्री अर्जुन मुंडा यांना ट्रायफेड (TRIFED) च्या मदतीने रायगड (महाराष्ट्र) आणि जगदालपूर (छत्तीसगढ) याठिकाणी ट्रायफेड प्रकल्प सुरू केला.
 • याअंतर्गत जंगलातील गौण उत्पादनांना योग्य मार्केट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 • तसेच याद्वारे आदिवासी क्षेत्रात रोजगारवृद्धी केली जाणार आहे.
 • याद्वारे मिळणार्‍या कच्च्या मालावर प्रधानमंत्री किसानसंपदा योजनेंतर्गत प्रक्रिया केली जाणार आहे.
 • देशभरातील वेगवेगळ्या ट्रायबल आऊटलेट्स वर प्रक्रिया झालेली उत्पादने उपलब्ध करून दिली जातील.
 • रायगडमधून मिळणार्‍या माहुला, आवळा, जामून यांचा वापर वेगवेगळी पेये तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
 • TRIFED – Tribal Co-operative Marketing Development Federation of India.
 • भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्या
 • स्थापना – १९८७
 • कार्य – आदिवासींच्या वस्तूंच्या विपणनाचा विकास करून आपल्या सभासदांच्या सामाजिक – आर्थिक विकासासाठी त्यांच्या हितासंबंधी जपणूक करणे.
 • ट्रायफेडमार्फत आदिवासींच्या गौणवनोपने व कृषी वस्तूंची प्रप्राप्ती व विक्रीची कामे केली जातात.

Contact Us

  Enquire Now