राम खांडेकर :
जन्म – ३ सप्टेंबर १९३४
मृत्यू – ८ जून २०२१ (वय – ८७ वर्षे)
- यशवंतराव चव्हाण ते नरसिंहराव अशी सलग पाच दशके सत्तेच्या रिंगणात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम
- पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीत टंकलेखक म्हणून कामास सुरुवात केली.
- १९५६ मध्ये भाषिक आधारावरील राज्यनिर्मितीमुळे त्यांची मध्यप्रदेशातील नागपूर मधून मुंबईला बदली झाली.
- १३ ऑक्टोबर १९५८ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मराठी स्टेनोग्राफर (टायपिस्ट) म्हणून त्यांची नियुक्ती
- १९६२ च्या भारत-चीन युद्धावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना खांडेकर त्यांच्यासोबतच कार्यरत होते.
- १९७७ मध्ये मोहन धारिया यांचे खासगी सचिव म्हणून कार्य केले.
- १९८१ मध्ये वसंतराव साठे यांचे खासगी सचिव म्हणून काम
- १९८५ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचेही खासगी सल्लागार म्हणून कार्य केले.
- १९९१ मध्ये नरसिंह राव पंतप्रधान असताना खांडेकरांनी स्वीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
- भालजी पेंढारकरांना फाळके पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न केले.
- सत्तेच्या दालनात राहूनही प्रसारण मंत्रालयातर्फे दाखवले जाणारे चित्रपट व दिल्लीत जानेवारीत होणारा ‘बीटिंग रिट्रीट’ हा सोहळा सरकारी पासेस मिळवून बघणे एवढाच मोह सबंध नोकरीभर बाळगणाऱ्या खांडेकरांना त्यांच्या परिचितांनी सोहळा आयोजित करून निरोप दिला.
लेखनकार्य : लोकसत्तासाठी साप्ताहिक स्तंभलेखन
२०१९ : स्तंभलेखांचे राजहंस पब्लिकेशनच्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकरूपात प्रकाशन