‘रामसेतू’च्या पाण्याखालील संशोधनाला पुरातत्त्व खात्याची परवानगी

‘रामसेतू’च्या पाण्याखालील संशोधनाला पुरातत्त्व खात्याची परवानगी

 • ‘रामसेतू’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाणारा ‘ॲडम्स ब्रिज’ या ब्रिजचे पाण्याखालून संशोधन करण्यास पुरातत्त्व खात्याने (एएसआय) मंजुरी दिली आहे.
 • रामसेतू मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित यांचा उलगडा करणे तसेच रामसेतूचे वय शोधून काढणे हा संशोधनाचा मुख्य उद्देश आहे.
 • गोव्यातील राष्ट्रीय सागरी अभ्यास संस्था व वैज्ञानिक आणि संशोधन परिषद यांनी या संशोधनाचा प्रस्ताव ठेवला होता, पुरातत्त्व खात्याच्या सल्लागार मंडळाने या संशोधनाचा प्रस्ताव व तपासणीला मंजुरी दिली.
 • या संशोधनासाठी, एन आय ओकडून ‘सिंधू रिझोल्यूशन’ किंवा ‘सिंधू साधना’ नावाची जहाजे वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही जहाजे सहज पाण्याखाली जाऊन नमुने गोळा करू शकतात.
 • हिंदू धर्मग्रंथ रामायणानुसार हा पूल भगवान यांच्या वानरसेनेने बांधला होता. आता रामायण काळातच याची निर्मिती झाली का? तो नकली वानर सैन्यानेच बांधला होता का? अशा अनेक वादाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या संशोधनाची मदत होणार आहे.
 • या संशोधनामुळे रामसेतूचे आणि त्याभोवतीच्या परिसराचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

 

रामसेतूबद्दल माहिती

 

 • उत्तर श्रीलंकेतील पश्चिम समुद्रतटावर मन्नार जिल्हा आहे. मन्नार शहर मन्नार द्वीपावर आहे. तेथून ३५ कि.मी. वर तलैमन्नार येथे श्रीलंका नौदलाचे मोठे केंद्र आहे. तेथून दोन कि.मी. अंतरावर रामसेतू आहे.
 • रामसेतू वरून पहिल्या १६ लहान द्वीपे एकत्र येवून एकत्र द्वीपसमूहासारखे दिसते. यातील आठ द्वीपे भारताच्या सरहद्दीत तर आठ द्वीपे श्रीलंकेच्या सरहद्दीत आहेत.
 • दोन्ही राष्ट्रांकडून रामसेतू येथे जायला मनाई आहे. केवळ सभोवतीच्या परिसरात मच्छीमारांना जाण्यास परवानगी आहे.
 • भारताचा पामवन बेटापासून ज्याला रामेश्वर बेट असेही म्हटले जाते. ते श्रीलंकेच्या मन्नार बेटांपर्यत असून ती एक चुनखडीच्या दगडांची रांग आहे. ही रांग ५० कि.मी. लांबीची असून ‘मन्नार’ची सामुद्रधुनी आणि ‘पालक स्ट्रेट’ ला वेगळे करते.
 • रामसेतूचे आधीचे नाव ‘नलसेतू’ होते. वानरसेनेमध्ये विश्वकर्म्याचे नल आणि नील नावाचे वानर होते. त्यांच्या आधिपत्याखालीच हजर वानरांच्या मदतीने व हनुमानाच्या सहाय्याने जवळपास ३२ कि.मी. लांबीचा सेतू बांधला गेल्याचे सांगितले जाते.
 • रामसेतू संदर्भातील या संशोधनामध्ये रेडिओमेट्रिक आणि थर्मोल्यूमिनिसन्स (टी एल) सारख्या डेटिंग म्हणजेच कालमापन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या पाण्यामध्ये असणाऱ्या शेवाळ्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच कोरलसमधील कॅल्शियम कार्बोनेटच्या प्रमाणावरून रामसेतूच्या कालावधीचा अंदाज बांधता येईल.

Contact Us

  Enquire Now