राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता
- महाराष्ट्रातील उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी या बाबींचा विचार करून सार्वजनिक कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
- या कौशल्य-विकास विद्यापीठासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील १०० एकर पैकी १५ एकर जागा देण्याचा निर्णय
- विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चासाठी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता
- कौशल्य विकास विभागामार्फत राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून सहा विभागांत सेंटर ऑफ एक्सलेन्स उभारण्याचा प्रस्तावित
- उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्य प्राप्त असे मनुष्यबळ निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.
- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगाचे माहेरघरही आहे.
- बॅंकिंग, वित्त रचना, नाविन्य, संशोधन कौशल्य विकास क्षेत्रात मनुष्यबळ निर्माण करण्याच्या संधी राज्याकडे आहे.
- सध्या भारतात आठ कौशल्य विकास विद्यापीठे आहेत.
अ) सार्वजनिक क्षेत्र – राजस्थान (१), हरियाणा (१), आंध्रप्रदेश (२)
ब) खासगी क्षेत्र – राजस्थान (१), पश्चिम बंगाल (१), ओदिशा (१), महाराष्ट्र (१)
स्किल इंडिया (कुशल भारत) योजना
- सुरुवात – १५ जुलै २०१५
- उद्देश – २०२२ पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी लोकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे.
- अकुशल श्रमपुरवठ्याचे कुशल श्रमपुरवठ्यात रुपांतर करणे.
- कौशल्य भारत – कुशल भारत