राज्य आरोग्य निर्देशांक – २०२१

राज्य आरोग्य निर्देशांक – २०२१

  • निती आयोगाने २०१९-२० दरम्यान राज्यांनी आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील कामाच्या आधारे तयार केलेला राज्य आरोग्य निर्देशांक – २६ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला.
  • ही आतापर्यंतची ही चौथी आवृत्ती आहे.
  • शीर्षक – निरोगी राज्ये, प्रगतिशील भारत
  • सुरुवात – २०१७
  • महत्त्वाचे – राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन विविध २४ निर्देशकांवर आधारित केले जाते.
  • निती आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व जागतिक बँकेच्या तांत्रिक सहाय्याने हा निर्देशांक विकसित केला आहे.

राज्यांची क्रमवारी

अ) मोठी राज्ये – 

१) केरळ

२) आंध्रप्रदेश

३) महाराष्ट्र

ब) लहान राज्ये

१) मिझोराम

२) मणिपूर

३) गोवा

क) संघराज्य क्षेत्र

१) चंदीगढ

२) दादरा नगर हवेली

३) दिल्ली

उपलब्धी

  • या निर्देशकांद्वारे राज्यांना आरोग्य धोरण तयार करण्यात मदत होणार आहे.
  • शाश्वत विकास उद्दिष्टे प्राप्त करण्यास राज्यांना प्रेरणा मिळेल.

मर्यादा

  • संसर्गजन्य रोग, गैर-संसर्गजन्य राज्य, मानसिक आरोग्य, प्रशासन आणि आर्थिक जोखीम संरक्षण या क्षेत्रांतील माहितीचा निर्देशकांमध्ये अभाव असल्याने या निर्देशांकावर परिपूर्ण नसल्याची टीका केली जाते.

Contact Us

    Enquire Now