राज्यातील ५० वर्षावरील अधिक जुन्या वृक्षांचे जतन करण्यासाठी हेरिटेज ट्री संकल्पना
- राज्यातील शहरामधील ५० वर्षावरील अधिक जुन्या वृक्षांना ‘प्राचीन वृक्ष’ (हेरिटेज ट्री) असे संबोधून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
- ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना राबवून संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- या सुधारणांमध्ये वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चिती, वृक्ष गणना, वृक्षाचे पुनर्रोपण, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतुदी या बाबींचा समावेश आहे.
- ५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविला जाईल.
- वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर एक वैधानिक प्राधिकरण स्थापन केले जाईल.
- स्थानिक पातळीवर वृक्षतज्ज्ञ हे स्थानिक वृक्ष प्राधिकरणाचा भाग असतील तर नगरपरिषदेच्या बाबतीत वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष ‘मुख्याधिकारी’ राहतील.
- दर ५ वर्षांनी प्राचीन वृक्षांची गणना आणि संवर्धन होईल.
- तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी नवीन झाडे ‘भरपाई वृक्षारोपण’ म्हणून लावण्याचे आदेश.
- नुकसानभरपाई म्हणून वृक्ष लागवड शक्य नसेल तर तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या मूल्यांकनाइतकी किंवा त्याहून अधिक रक्कम वृक्षतोडीच्या अर्जदारांना द्यावी लागणार आहे.
- दंडाची रक्कम वेळोवेळी अधिसूचित केली जाईल ही रक्कम जास्तीत जास्त प्रति वृक्ष एक लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहील.