
राज्यातील शेतकऱ्यांसाठी तीन लाखांचे बिनव्याजी पीक कर्ज
- राज्य सरकारच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- या योजनेअंतर्गत तीन लाखांवर २ टक्के व्याजाने कर्ज दिले जाते, मात्र यंदा हे कर्ज बिनव्याजी स्वरूपात देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय
अ) शेतमालाचे नुकसान होऊ नये, म्हणून बाजार समिती आवारात धान्य चाळण यंत्रे बसविणे.
ब) शेतमाल बाजारात पाठविण्यापूर्वी गाव पातळीवर मालाची आर्द्रता तपासणीसाठी आर्द्रता मीटरची सोय.
क) किमान आधारभूत किंमत अंतर्गत केंद्र सरकारच्या खरेदीसाठीची २५% मर्यादा न ठेवता खरेदी केंद्रावर येणारा संपूर्ण माल विकत घ्यावा.
कर्जपुरवठ्याची प्रक्रिया
अ) खरीप हंगामापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी.
ब) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जदार शेतकऱ्यास केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरीत करून, एटीएमद्वारे शेतकऱ्यास रक्कम उपलब्ध.
फायदे
- यामुळे कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ लाभ.
- वेळेवर कर्जपुरवठ्यामुळे शेतकऱ्याला शेतीचे योग्य नियोजन शक्य होईल.
पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना
- सुरुवात – ५ जुलै २०१० (महाराष्ट्र शासन)
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लघुमुदतीच्या पीककर्जावर व्याज अनुदान दिले जाते.
- कर्जाची रक्कम आणि व्याज
कर्ज | व्याज |
१,००,००० | ०% |
१,००,००० – ३,००,००० | २% |
- अनुदान – राज्य सरकार
- लाभार्थी – राज्यातील शेतकरी
- ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास दिलेले अनुदान काढून घेतले जाते.
किसान क्रेडिट कार्ड
- सुरुवात : १९९८ – ९९ (भारत सरकार, रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड)
- उद्देश – पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी