
राज्यातील रुग्णालयांना स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक
- कोरोनाकाळात ऑक्सिजनची वाहतूक करणे आणि वेळेवर पुरवठा होणे याबाबत अनेक समस्या समोर येत आहेत.
- आता केवळ शासकीयच नव्हे तर सर्वच खासगी असणाऱ्या 50 खाटांवरील रुग्णालयांना त्यांचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले. याबद्दल लवकरच आदेश निघणार आहेत.
- त्यासाठी नर्सिंग ॲक्टमध्ये बदल करावा लागला तरी राज्य शासन अध्यादेश काढून तेही करेल, असेही त्यांनी सांगितले.
- महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना सुद्धा स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा लागणार आहे. सध्या आपण सर्वच जण एका कठीण प्रसंगातून जात आहोत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एकीकडे चिंता असली तरी दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
- अशा वेळी सकारात्मकता आवश्यक असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वांनीच धीर दिला पाहिजे. मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशन याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.