
राजेश खुल्लर जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी
- १९८८ च्या बॅचचे IAS अधिकारी राजेश खुल्लर यांची वॉशिंग्टन डीसी येथील जागतिक बँकेत कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) प्रभारी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ते त्याच्या कार्यकाळाच्या तारखेपर्यंत (२३ ऑगस्ट २०२३) राजेश खुल्लर यांच्या नियुक्तीस मान्यता दिली.
- खुल्लर सध्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या प्रधान सचिवांच्या पदावर रुजू आहेत.
- नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते जागतिक बँकेत रुजू होतील.
- कार्यकारी संचालक म्हणून खुल्लर विश्व बँकेत भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंका यांचे प्रतिनिधित्व करतील.
- वर्ल्ड बँक समूहामध्ये २५ कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. जे प्रत्येक देशाचे किंवा देशातील मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. ते एकतर नियुक्त होतात किंवा निवडले जातात.
- जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झालेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे माजी प्रधान सचिव धनलाल कुमार यांच्यानंतर ते हरियाणाचे दुसरे IAS अधिकारी आहेत.
- खुल्लर यांनी केंद्र आणि हरियाणा या दोन्ही सरकारांमध्ये सहसचिव (आर्थिक व्यवहार विभाग), केंद्रीय अर्थ मंत्रालय अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
- एकेकाळी त्यांनी हरियाणाचे गृहसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी ते नगरपालिका आयुक्त (गुडगाव व फरीदाबाद) आणि उपायुक्त (सोनीपत व रोहतक) राहिलेले आहेत.
जागतिक बँक
- स्थापना – जुलै १९४४ (ब्रेटनवूड परिषदेत)
- बँकेचे मूळ नाव – IBRD (International Bank for Reconstruction and Development) असे आहे.
- ३१ डिसेंबर १९४५ ला IBRD ची स्थापना करण्यात आली. १ जून १९४६ पासून IBRD ने प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.
- १९६० मध्ये IDA (International Development Association) ची स्थापना झाली.
- IBRD आणि IDA या दोन संस्थांना मिळून जागतिक बँक असे म्हणतात. या दोन संस्थांसोबत आणखी ३ संस्था (IFC, MIGA, ICSID) कार्यरत आहेत, या पाचही संस्थांना एकत्रितरीत्या जागतिक बँक गट असे म्हणतात.
- मुख्यालय – वॉशिंग्टन जी. सी
- अध्यक्ष – डेव्हिड मालपास
- सदस्य – १८९ देश (IBRD), १७३ देश (IDA)