राजीव शंकरराव सातव
- जन्म : २१ सप्टेंबर १९७४ (पुणे)
- निधन : १४ मे २०२१ (४६ वर्षे) कोविडनंतर सायटोमॅगिली विषाणूची लागण
- पक्ष : भारतीय काँग्रेस पक्ष
- माजी मंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र
- शिक्षण :
- नु.म.वि. , पुणे;
- फर्ग्युसन कॉलेज, पुणे;
- विधी शाखेची पदवी
राजकीय कारकीर्द :
- २००२ : मसोड (ता. कळमनुरी, हिंगोली) पंचायत समितीचे सदस्य
- २००७ : जिल्हा परिषदेचे कृषी सभापती
- २००८-१० : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
- २०१०-१४ : राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष
- २००९ : कळमनुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवड
- २०१४-१९ : १६ व्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून विजयी
- २०१७ : गुजरात राज्याचे प्रभारी खासदार व त्यापूर्वी सौराष्ट्र प्रदेशाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव
- २०२० : राज्यसभा सदस्य
कार्ये :
- शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात.
- कळमनुरी येथे सशस्र सीमा दल, गोळेगाव (ता. औंढा नागनाथ) येथे कृषी विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार.
- लिगो इंडियाचा गुरुत्वीय लहरींबाबत संशोधनाचा प्रकल्प हाती घ्यावा यासाठी प्रयत्न केला.
- पुरवणी प्रश्न, शून्य प्रहर आणि संसद नियम ३७७ अंतर्गत राष्ट्रीय मुद्द्यांसह हिंगोली मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
- एनडीएमध्ये स्री कॅडेटला प्रवेश देण्याची मागणी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कायद्याची गरज, दारुगोळा कमतरतेवरील कॅगचा अहवाल, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वित्तीय सहाय्यासंबंधी मागणी, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
- लोकसभेतील त्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्रातील नीट (NEET) परिक्षा केंद्राची संख्या वाढवण्यात आली आहे.
- कौशल्य विकास, मागासवर्गीयांसंबंधीच्या राष्ट्रीय आयोगात घटनात्मक दुरुस्ती करण्याविषयीचे विधेयक २०१७, आधार बिलास काँग्रेसचा प्रतिसाद.
संसदेतील सहभाग :
- १६ व्या लोकसभेत त्यांनी २०५ चर्चांमध्ये सहभाग नोंदवला व त्यात १०७५ प्रश्न विचारले (देशात ५ वे); तसेच २३ खासगी विधेयके त्यांनी मांडले.
सन्मान :
- ४ वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविण्यात आले आहे.
- MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्सचा ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठा – २०१८ – सर्वात्कृष्ट तरुण पुरस्कर्ता’