राजमाता विजयराजे सिंधिया यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांचे नाणे जाहीर
- 12 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जाहीर केले.
- अर्थ मंत्रालयाने या खास नाण्याची मुद्रा तयार केली.
- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल आणि विजयाराजे सिंधिया यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्याबद्दल :
- जन्म 12 ऑक्टोबर 1919
- गरीब लोकांना आपले जीवन समर्पित करणाऱ्या विजयाराजे सिंधिया यांना ‘ग्वाल्हेरची राजमाता’ म्हणून ओळखले जाते.
- 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी भाजपच्या रामजन्मभूमी चळवळीला लोकप्रिय करण्यास मोलाचे योगदान दिले.
- 1957-67 या काळात त्यांनी खासदार म्हणून काम केले.
- 1998 मध्ये आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा देऊन राजकारण सोडले. तोपर्यंत त्यांनी भाजपच्या उपाध्यक्षपदी काम केले.
- जानेवारी 2001मध्ये त्यांचे निधन झाले.
- लेखक मनोहर भाळगोनकर यांच्या पाठिंब्याने विजयाराजे सिंधिया यांनी ‘ग्वाल्हेरची शेवटची महाराणी’ हे आत्मचरित्र लिहिले.