राजनाथ सिंह – तेजसच्या दुसऱ्या टप्प्यातील उत्पादनाचे उद्‌घाटन

राजनाथ सिंह – तेजसच्या दुसऱ्या टप्प्यातील उत्पादनाचे उद्‌घाटन

 • हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरू येथील प्रकल्पात ‘तेजस’च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्पादनाचे उद्‌घाटन राजनाथ सिंह यांनी केली.
 • त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले प्रतिस्पर्धी विमानांमध्ये ‘तेजस’ सरस आहे.
 • संरक्षण क्षेत्रात भारत इतर देशावर अवलंबून राहू शकणार नाही. यावर जोर देत ‘तेजस’ या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानाचे कौतुक केले.
 • ‘तेजस’चे उत्पादन हे संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल.
 • इंजिन क्षमता, रडार यंत्रणा हवेत इंधन भरण्याची यंत्रणा, देखभाल या बाबतीत ‘तेजस’ सरस व स्वस्तही आहे. अनेक देशांनी ‘तेजस’मध्ये रुची दाखविली आहे.
 • बंगळुरुमध्ये ३ फेब्रुवारीपासून ‘एरो इंडिया २०२१ शो’ सुरू होणार आहे त्यात ‘तेजस’चा समावेश
 • बंगळुरूमध्ये हा १३ वा ‘एरो इंडिया शो’ आहे.
 • संरक्षण मंत्रालयाकडून हिंदुस्तान एरोनॉटिक्ससोबत ४८ हजार कोटीचा एकूण ८३ ‘तेजस’ विमान खरेदीचा सौदा मंजूर करण्यात आला.
 • २०२४ मध्ये विमानांचा प्रत्यक्ष पुरवठा सुरू होईल.

Contact Us

  Enquire Now