रशिया युक्रेन विवाद

रशिया युक्रेन विवाद

 • नोव्हेंबर २०२१ मध्ये रशियाने तब्बल ९० हजार सैनिकांची युक्रेनच्या सीमेवर जमवाजमव केली. त्यामुळे युक्रेन रशिया वाद चर्चेमध्ये आहे.
 • त्यानंतर अमेरिकेने या वादात हस्तक्षेप केल्याने रशियाने माघार घेतली आहे.

काय आहे विवाद?

 • उभय देशांतील वादाचे मूळ नोव्हेंबर २०१३ मधील युक्रेनमधील नागरी अशांततेच्या चळवळीमध्ये आहे.
 • युक्रेन हा देश रशिया आणि युरोप यांना जोडणारा देश आहे. १९९१ पर्यंत हा देश सोव्हिएत युनियनचा भाग होता. तेव्हापासून कमकुवत अर्थव्यवस्था आणि रशिया किंवा युरोप समर्थक यांच्या विचलित होणारे परकीय धोरण यांमुळे होरपळून निघाला आहे.
 • १९९१ ला सोव्हिएत युनियनपासून अल्पित झालेल्या युक्रेनच्या क्रिमिया या भागात रशियाचे मोठे लष्करी तळ होते. क्रिमियामध्ये बहुतांश रशियन नागरिक असून या प्रदेशाच्या भौगोलिक स्थानामुळे याला महत्त्व प्राप्त झालेले आहे.
 • मार्च २०१४ मध्ये रशियाने, रशियन भाषिकांच्या संरक्षणासाठी क्रिमियाना आपल्या ताब्यात घेतले.
 • त्यानंतर युक्रेनचा भाग असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशातील फुटीरवाद्यांनी रशियाच्या समर्थनात स्वत:ला युक्रेनपासून वेगळे असल्याचे घोषित केले.
 • त्यातून काही महिने जोरदार लढाई सुरू राहिली.
 • २०१५ मध्ये किव-(युक्रेनची राजधानी) मॉस्को शांतता करार मिन्स्कमध्ये (रशिया) झाला.
 • मात्र वारंवार या युद्धविराम कराराचे दोन्ही पक्षांकडून उल्लंघन होत आहे.
 • रशियाने अमेरिकेकडून युक्रेनला नाटो देशांत सहभागी न करण्याचे आश्वासन मागितले आहे. मात्र याबाबत अमेरिकेने कोणतेही आश्वासन दिलेले नाही.
 • त्यामुळे रशियाने मोठ्या संख्येने सैन्य सीमेकडे हलवले आहे

Contact Us

  Enquire Now