रशियात पुतीन पर्व!
- रशियाच्या राज्यघटनेत बदल करण्यात आला असून ब्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पदावर राहू शकतात. २००० सालापासूनच रशियाच्या राजकारणाची सूत्रे पुतीन यांच्या हातात आहेत.
- पुतीन २००० ते २००८ या कालावधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते.
- त्यानंतर २००८ ते २०१२ रशियाचे पंतप्रधान होते.
- पुतीन २०१२ साली पुन्हा निवडणूक जिंकले.
- रशियामध्ये एक व्यक्ती सलग दोनदा निवडणूक लढवू शकते. तिथे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सहा वर्षे असा आहे. त्यानुसार त्यांचा सध्याचा कार्यकाळ २०२४ साली संपणार होता. मात्र त्याआधीच जनमत होऊन संविधानात बदल करण्यात आला.
- या मतदानात ७७ टक्के जनतेनं पुतीन यांना अपेक्षित बदलाच्या बाजूने मतदान केले.
- त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून सत्तेत असलेले ६७ वर्षीय पुतीन आता २०३६ सालापर्यंत म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत राष्ट्रपती राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- सध्या ब्लादिमीर पुतीन जगभरातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात.
रशियाबद्दल :
- राजधानी : मॉस्को
- चलन : रशियन रुबल