रशियात कोरोनावरील औषधाला मंजुरी
- रशियात कोरोनावरील उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या कोरोनावीर या अँटीव्हायरल औषधाच्या वापराला परवानगी देण्यात आली.
- रशियातील ‘आर-फार्म’ या फार्मा कंपनीने कोरोना रुग्णावरील उपचारासाठी हे औषध तयार केले आहे.
- हे रशियातील पहिले औषध असून या औषधाला ‘कोरोनावीर’ असे नाव देण्यात आले आहे. कोरोनावीर हे औषध कोरोना लक्षणाला केंद्रित नसून ते थेट आजारालाच लक्ष्य बनवते तसेच रुग्णांच्या शरीरात विषाणूंची संख्या वाढण्यापासून अटकाव निर्माण करते.