रशियाची कोरोना लस ९१.६ टक्के प्रभावी

रशियाची कोरोना लस ९१.६ टक्के प्रभावी

  • रशियाची स्पुटनिक-व्ही ही कोरोनावरील लस प्रयोगशाळेतील अंतिम टप्प्यातील चाचण्यात ९१.६ टक्के परिणामकारक ठरल्याचे परीक्षणात आढळले.
  • लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलने हे वृत्त दिले आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबतच्या या आश्वासक वृत्तामुळे जागतिक साथीविरुद्ध आणखी एक अस्त्र मिळाले आहे.
  • मॉस्कोतील गामालेया इन्सिटट्यूटने ही लस विकसित केली आहे. सप्टेंबरपासून सुरू असलेल्या चाचण्यांमधील आकडेवारीशी हे निष्कर्ष सुसंगत आहेत. अंतिम चाचणी होण्यापूर्वीच रशियाने लसीचा वापर सुरू केला होता, त्याचे आता समर्थन होत आहे.
  • गामालेयाच्या डेनिस लोगूनोव यांच्या नेतृत्वाखाली लस विकसित करण्यात आली. त्यात १९ हजार ८६६ स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. चाचणी सुरू झाल्यापासून लस मिळालेल्या १६ जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. प्लॅसेबो देण्यात आलेल्या ६२ जणांना त्रास झाला. हे अपवाद वगळता लस परिणामकारक आहे.
  • अकारण घाई, सोपा व स्वस्त मार्ग यामुळे रशियावर टीका झाली होती. मात्र हे निकाल शास्त्रीय सिद्धांतांना धरून आहेत, असे मत लॅन्सेटमध्ये रीडिंग विद्यापीठाचे प्रा.इथन जोन्स आणि लंडन स्कूल ऑफ हायजिन-ट्रॉपिकल मेडिसीन येथील प्रा. पॉली रॉय यांनी व्यक्त केले.

Contact Us

    Enquire Now