रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार
- वोकहार्ड फाऊंडेशनच्या वतीने नामवंत कार्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि अन्य क्षेत्रातील कार्यासाठी हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
- रतन टाटा यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला.
- वोकहार्ड फाऊंडेशनचे विश्वस्त हुजैफा खोराकीवाला आणि भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्था | क्षेत्र |
१) ONGC | पशुकल्याण |
२) वेदांता लिमिटेड | बालकल्याण |
३) हिंदुस्थान युनिलिव्हर | कोरोना काळातील कार्यासाठी |
४) हिरो मोटोकॉर्प | दिव्यांग घटकासाठी |
५) कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स | शैक्षणिक |
६) लार्सन ॲण्ड टुर्बो | कौशल्य विकास |
७) एस्सार | ट्रान्स्जेंडर एम्पॉवरमेंट |
८) आयटीसी | पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी |
९) आरईसी | महिला सबलीकरण |
१०) डॉ. जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे, सूरजकुमार | वैयक्तिक विशेष योगदान |
११) कोटक महिन्द्रा बँक | उद्योग क्षेत्रातील विशेष योगदान |