रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ ॲकॅडमी’ वर निवड
- ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ विजेते रणजितसिंह डिसले यांची ‘स्टुडंट प्राइझ ॲकॅडमी’वर निवड झाली आहे. त्यांच्यासोबत अभिनेते ॲस्टन कुचर व मिला कुनिस, तसेच अमेरिकेतील महिलांच्या गटातील राष्ट्रीय खेळाडू जुली एट्र्झ व त्यांचे पती झाक एट्र्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत.
- डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करतात. मागच्याच वर्षी त्यांना ‘ग्लोबल टिचर’ पुरस्कार मिळाला होता. एक अब्ज डॉलरचा हा पुरस्कार होता.
- याच पुरस्काराशी साधर्म्य असणाऱ्या ५० हजार डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
- वार्के फाऊंडेशनने चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’ च्या सोबतीने हा पुरस्कार सुरू केला आहे.
- ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ हे अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आले आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते आपण त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले आणि त्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिले तर ते जग पादांक्रत करू शकतील. त्यांच्या कथांवर झोत टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जागतिक विद्यार्थी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अशा प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा असल्याचे डिसले यांनी सांगितले.
- तसेच डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. ‘कार्लो मझोने – रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप असेल. पुढील दहा वर्षे ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
- रणजित डिसले यांनी पुरस्काराच्या सात कोटींपैकी साडेतीन कोटींची रक्कम नऊ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझोने हे त्यापैकीच एक आहेत.
- डिसले यांनी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवले. त्यांनी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसेव्ही होण्यासाठी प्रेरित केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वत:ची प्रयोगशाळा उभारली आहे.
- त्यांनी तयार केलेली क्युआर कोडेड पुस्तके आज अकरा देशातील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या अध्ययन पद्धतीतून ते दिडशेहून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करतात.