यास चक्रीवादळ
- यास हे अतिगंभीर चक्रीवादळ (Very Severe Cyclonic Storm) या स्वरूपातील चक्रीवादळ होते.
- यापूर्वी तौक्ते या अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे केरळ, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटक या राज्यांना फटका बसला होता.
- २२ मे २०२१ या दिवशी उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले व याचेच रूपांतर अतिशय शक्तिशाली अशा ‘यास’ या चक्रीवादळात झाले.
‘यास’ चक्रीवादळाची ठळक वैशिष्ट्ये:
- ओमान या देशाने चक्रीवादळाचे नाव ‘यास’ असे दिलेले आहे.
- हा पर्शियन भाषेतील शब्द असून याचा इंग्रजीतील अर्थ ‘जास्मिन’ असा होतो.
- या चक्रीवादळाचा कमाल वेग : १३० ते १४० किमी/तास.
- भारतातील प्रभावित क्षेत्रे: ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, अंदमान-निकोबार बेटे.
- या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने २८ मे २०२१ रोजी ओडिशा पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यांसाठी १००० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.
- साधारणतः उत्तर हिंदी महासागर प्रदेशात (बंगालचा उपसागर व अरबी समुद्र) मान्सूनपूर्व (एप्रिल ते जून) आणि मान्सूननंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) या काळात उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांची निर्मिती होते.
- मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील चक्रीवादळे ही तीव्र स्वरूपाची व विनाशकारी असतात.
चक्रीवादळांचे वार्याच्या वेगानुसार प्रकार :
१ | कमी दाबाचा पट्टा (Low Pressure) | < ३२ Km/h < १७ Kt (Knot) |
२ | कमी दाब (Depression) | ३२-५० Km/h १७-२७ Kt |
३ | खोल कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) | ५१-५९ Km/h २८-३३ Kt |
४ | चक्रीवादळ (Cyclone) | ६०-९० Km/h ३४-४७ Kt |
५ | तीव्र चक्रीवादळ (Severe Cyclonic Storm) | ९०-११९ Km/h ४८-६३ Kt |
६ | अति तीव्र चक्रीवादळ (Very Severe Cyclonic Storm) | ११९-२२० Km/h ६४-११९ Kt |
७ | सुपर सायक्लॉन (Super Cyclone) | ≥ २२१ Km/h ≥ १२० Kt |
चक्रीवादळांची निर्मिती :
- समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणार्या वार्यांमुळे वादळ तयार होते.
- वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा तसेच समुद्राचे तापमान हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे.
चक्रीवादळाच्या निर्मीतीस पोषक स्थिती :
- समुद्रात ६० मीटर खोलीपर्यंत २६०° सेल्सिअस तापमान, कोरिओलीस फॉर्सचे अस्तित्व, कमी दाबाचे क्षेत्र.
- ही वादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने फिरतात.
- जमिनीवर तयार होणार्या वादळांना टोरनॅडो म्हणतात.
चक्रीवादळांना जगभरात पुढील नावांनी ओळखतात
अ) हिंदी महासागर – चक्रीवादळ (Cyclone)
ब) वेस्ट इंडिज बेटे आणि अटलांटिक महासागर – हरिकेन
क) चिनी समुद्र आणि पॅसिफिक महासागर – टायफून
ड) ऑस्ट्रेलिया – विली-विली
लँडफॉल म्हणजे काय?
- पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते २००० किलोमीटर पर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणार्या वार्यांचा वेग ताशी २०० किमीचा टप्पा पार करतात.
- जमिनीला जेव्हा हे वारे धडकतात, त्या स्थितीला लँडफॉल असे म्हणतात.
अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात सर्वाधिक चक्रीवादळे निर्माण होण्याची कारणे :
अ) तापमान: मान्सूनपूर्वी आणि मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागराचे तापमान अधिक उबदार असते.
ब) भौगोलिक रचना: बंगालच्या उपसागरातून येणार्या वार्याला पूर्व-भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीन असल्याने वार्यांना कमी जागा. त्यामुळे ते अधिक विध्वंसक बनतात. याउलट आजूबाजूला समुद्र असल्याने अरबी समुद्रातील चक्रीवादळे ही लवकर विरतात.
- बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणार्या चक्रीवादळाचे गुणोत्तर ४: १ आहे.
वर्ष बंगालचा उपसागर अरबी समुद्र
चक्रीवादळ नाव देणारे देश मृत्यू चक्रीवादळ नाव देणारे देश मृत्यू
२०२१ यास ओमान ४ तौक्ते म्यानमार १०४
२०२० अम्फान थायलंड ९० निसर्ग बांगलादेश ४
निवार इराण १२
बुरेवी मालदीव ९
२०१९ फनी बांगलादेश ६४ हिक्का मालदीव १३
बुलबुल पाकिस्तान २५
२०१८ तितली पाकिस्तान ७८ मेकानू मालदीव २६
लुबान ओमान १४
२०१७ ओखी बांगलादेश ११०
२०१६ वरदाह पाकिस्तान ६
२०१५ चपाला बांगलादेश ५
मेघ भारत १८
२०१४ हुडहुड ओमान ४६
२०१३ फाइलिन थायलंड २१
२०१२ नीलम पाकिस्तान ४३
२०११ कैला मालदीव १४
२०१० लैला पाकिस्तान ६ फेत ४४
एकूण ५१४ १४८
चक्रीवादळाचे नामकरण
- जगात निर्माण होणार्या चक्रीवादळांना पुढील ९ विभागांनुसार नावे देण्यात येतात.
१. उत्तर अटलांटिक
२. ईशान्य पॅसिफिक
३. उत्तर मध्य पॅसिफिक
४. वायव्य पॅसिफिक
५. उत्तर हिंदी महासागर
६. नैर्ऋत्य हिंदी महासागर
७. ऑस्ट्रेलिया
८. दक्षिण पॅसिफिक
९. दक्षिण अटलांटिक
उत्तर हिंदी महासागर विभाग
- या भागात निर्माण होणार्या चक्रीवादळांना १३ आशियाई देश नावे देतात.
- १३ देशांनी १३ चक्रीवादळांच्या नावांची यादी दिलेली आहे. अर्थात अशी एकूण १६९ नावे या यादीत आहेत. डब्ल्यूएमओ (World Meteorological Department) / ईएससीएपी पॅनल सदस्य देशांनी स्वीकारलेल्या उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांच्या यादीतील स्तंभ १:
क्र. | देश | नाव |
१ | बांगलादेश | निसर्ग |
२ | भारत | गती |
३ | इराण | निवार |
४ | मालदीव | बुरेवी |
५ | म्यानमार | तौक्ते |
६ | ओमान | यास |
७ | पाकिस्तान | गुलाब |
८ | कतार | शाहीन |
९ | सौदी अरेबिया | जावद |
१० | श्रीलंका | असानी |
११ | थायलंड | सतरंग |
१२ | संयुक्त अरब अमिराती | मांडस |
१३ | येमेन | मोचा |
- भारतातर्फे भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department – IMD) चक्रीवादळांना नावे देते.
चक्रीवादळाच्या नव्या यादीत भारताने सुचविलेली तेरा नावे :
१. गती
२ तेज
३. मुरासू
४. आग
५. व्योम
६. झोर
७. प्रोबाटो
८. नीर
९ प्रभंजन
१०. घुरनी
११. अंबुड
१२. जलाधी
१३. वेग