यावर्षी प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीनेच साजरा करणार – बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द

यावर्षी प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीनेच साजरा करणार – बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द

  • सर्व भारतीय दरवर्षी मोठ्या उत्साहाने २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करतात. या वर्षीसुद्धा तसे नियोजन आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते.
  • परंतु कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. या नव्या कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करत असल्याचे सरकारला कळविले. गेल्या ५५ वर्षांत असे प्रथमच घडले. म्हणून या वर्षीचा प्रजासत्ताक दिन पाहुण्यांशिवाय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
  • यापूर्वी सुद्धा १९५२, १९५३ आणि १९६६ साली प्रमुख पाहुण्यांशिवाय हा कार्यक्रम साजरा झाला होता.
  • भारतीय प्रोटोकॉलप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हा सर्वात मोठा सन्मान मानला जातो. स्वत: देशाचे प्रथम नागरिक (राष्ट्रपती) त्यांचे आदरातिथ्य करतात. प्रमुख पाहुण्यांना राष्ट्रपती भवन येथे गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. स्वागत समारोह, पाहुण्यांच्या हस्ते ‘राजघाट’ येथे पुष्पांजली अर्पण केली जाते व मेजवाणी दिली जाते.
  • प्रमुख पाहुणे ठरविण्याची ही प्रक्रिया सहा महिने अगोदरपासून सुरू होते. ज्या देशाचे प्रमुख प्रजासत्ताक दिनी बोलवायचे आहे त्या देशाबरोबरचे भारताचे संबंध, व्यापार, सहकार्य, राजकीय परिस्थिती इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातात.
  • या प्रक्रियेतून तयार झालेली यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली जाते. पंतप्रधानांची संमती मिळाल्यास अंतिम मंजुरीसाठी राष्टपतींकडे पाठवली जाते.
  • जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाल्याने या संदर्भात आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जर उपस्थित राहू शकत नसतील तर यावर्षीचा शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये असा प्रश्न काँगेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांनी उपस्थित केला आहे.

काही मागील वर्षाचे प्रमुख पाहुणे

  • २०२० – जेर मेस्सियास बोलसोनारो (ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष)
  • २०१९ – सिरील रामासोफा (दक्षिण आफ्रिका राष्ट्राध्यक्ष)
  • २०१८ – ASEAN सदस्य राष्ट्रांचे प्रमुख
  • २०१७ – युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान (संयुक्त अरब अमिरात)
  • २०१६ – फ्रान्सोइस ओलांद (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष)
  • २०१५ – बराक ओबामा (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष)
  • २०१४ – शिंजो आबे (जपानचे पंतप्रधान)

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now