यंदा अर्थसंकल्पाची छपाई होणार नाही
- स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री आर.के षण्मुखम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947ला अर्थसंकल्प सादर केला होता.
- पहिल्या अर्थसंकल्पाच्या प्रती छापण्यात आलेल्या नव्हत्या.
- तब्बल 73 वर्षांनंतर म्हणजे 1947च्या अर्थसंकल्पानंतर 2021-22च्या अर्थसंकल्पाच्या कागदपत्राच्या प्रती न छापण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- कोविडच्या 19च्या प्रादुर्भावामुळे सरकारने अर्थसंकल्पाची छपाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला 2021-22 अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
- संसद सदस्यांना अर्थसंकल्पाची डिजिटल प्रत देण्यात येणार आहे.
- यंदाचा अर्थसंकल्प काही प्रथा आणि पायंडा मोडणारा राहणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यानी केली.
- नॉर्थ ब्लॉक येथे अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापली जातात.
- अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्यानंतर त्या सील करून वितरण होईपर्यंत 100 कर्मचारी व अधिकारी तेथेच राहतात व सर्वांसाठी हलवा बनवितात पण ही परंपराही मोडून काढण्यात आली आहे.
भारतीय अर्थसंकल्पाशी संंबंधित काही बदल –
जेम्स विल्सन – 7 एप्रिल 1960 – भारतात अर्थसंकल्प पद्धतीचा पाया
षण्मुखम शेट्टी – 26 नोव्हेंबर 1947 – स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. (अर्थसंकल्पाची छपाई न करता)
यशवंत सिंह – 2001 – 2000 पर्यंत बजेट संध्याकाळी 5.00 वाजता मांडायचे.
2001 पासून ही प्रथा बदलून सकाळी 11.00 वाजता चालू.
अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जाते.