मैं भी डिजिटल ३.०

मैं भी डिजिटल ३.०

 • गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ‘मैं भी डिजिटल ३.०’ ही मोहीम सुरू केली आहे.

काय आहे ‘मैं भी डिजिटल ३.०’?

 • रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी (SVS) डिजिटल ऑनबोर्डिंग आणि प्रशिक्षण (DOaT) साठी सुरू करण्यात आलेली ही विशेष मोहीम आहे.
 • PM स्वनिधी योजनेअंतर्गत ज्यांना आधीच कर्ज दिले गेले आहे अशा SVs चे डिजिटल ऑनबोर्डिंग करण्याचे उद्दिष्ट आहे.
 • कर्ज देणाऱ्या संस्थांना एका टिकाऊ QR कोड आणि युनिफाइड पेमेंट्‌स इंटरफेस (UPI) आयडी जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
 • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकात्मिक आयटी प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.
 • यामुळे SVs पीएम स्वनिधी (PM SVANNIDHI) पोर्टलद्वारे थेट कर्जासाठी अर्ज करू शकतात.
 • प्रधानमंत्री स्वनिधी योजना (पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी):
 • आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आर्थिक प्रोत्साहन -II चा भाग म्हणून याची घोषणा करण्यात आली.
 • अंमलबजावणी : १ जून २०२०
 • उद्देश : कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे विपरीत परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे जीवनमान पुन्हा सुरू करण्यासाठी परवडणारे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देणे.

फायदे 

१) खेळत्या भांडवलासाठी रु. १००० पर्यंतचे कर्ज

२) नियमित परतफेडीला प्रोत्साहन

३) डिजिटल व्यवहारांसाठी बक्षिसे

लाभार्थी – २४ मार्च २०२० रोजी किंवा त्यापूर्वी नागरी भागात विक्री करण्यात गुंतलेले सर्व फेरीवाले. योजनेअंतर्गत नागरी स्थानिक संस्था (यूएलबी)/नगर विक्री समिती लाभार्थ्यांचे ओळख पटण्याचे काम करतील.

वित्तपुरवठा : नागरी फेरीवाले रु. १००००/- पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास पात्र

व्याज अनुदान – योजनेंतर्गत कर्ज घेणारे लाभार्थी ७% दराने व्याज अनुदान मिळण्यास पात्र

स्ट्रीट व्हेंडर्ससाठी (फेरीवाले) इतर उपक्रम :

१) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (२०१५)

२) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (२०१५)

३) जन-धन योजना (२०१४)

४) इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम, १९९६

५) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (२०१९)

६) प्रधानमंत्री मातृवंदना योजना (२०१०)

Contact Us

  Enquire Now